Job Alert : ५वी पासांपासून ते पदवीधरांपर्यंत सगळ्यांना मिळणार नोकरी; आजच करा अर्ज

भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पाचवी पास असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, शिक्षक पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी बीएडधारक असणे आवश्यक आहे.
CRPF
CRPFgoogle
Updated on

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. CRPF दादरी रोड ग्रेटर नोएडा येथे मुख्याध्यापिका, शिक्षक आणि आया या पदांसाठी भरती होत आहे.

या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार rect.crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

अधिसूचनेनुसार केवळ ९ पदे भरतीद्वारे भरली जातील. उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज योग्यरित्या अर्ज भरावा. कारण चुकीच्या पद्धतीने भरलेला फॉर्म विभागाकडून स्वीकारला जाणार नाही. (recruitment in CRPF job for 5th pass job for Bed graduates recruitment of teachers ) हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

CRPF
Job Alert : १० उत्तीर्णांसाठी मोठी संधी; 'यंत्र इंडिया'मध्ये ५ हजार जागांवर भरती

अर्जदाराची शैक्षणिक पात्रता

आयाच्या पदांवर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पाचवी पास असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, शिक्षक पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी बीएडधारक असणे आवश्यक आहे. इतर पदांशी संबंधित पात्रता अधिकृत वेबसाइटवर तपासली जाऊ शकते.

वय श्रेणी

उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षे असावे. तथापि, भारत सरकारच्या नियमांनुसार उमेदवारांना वयातही सवलत दिली जाईल.

CRPF
Job Alert : RECमध्ये विविध पदांवर भरती; ३ लाखांपर्यंत पगार घेण्याची संधी

निवड प्रक्रिया

जे उमेदवार अर्ज करतील त्यांची निवड परीक्षा न घेता केली जाईल. यासाठी १ मे २०२३ रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

मुलाखतीसाठी उमेदवारांना सकाळी १० वाजता पोलीस उपमहानिरीक्षक, ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, दादरी, ग्रेटर नोएडा यांच्या कार्यालयात पोहोचावे लागेल. अधिक तपशील उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.

भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. तसेच उमेदवारांना फॉर्म पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय, ग्रुप सेंटर, केंद्रीय राखीव पोलीस दल, दादरी रोड, ग्रेटर नोएडा-२०१३०६ येथे पाठवावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ एप्रिल २०२३ आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()