मुंबई : आयडीबीआय बँकेने मोठ्या प्रमाणावर भरती सुरू केली आहे. IDBI बँकेने एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट मॅनेजर ग्रेड A पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण १ हजार ५४४ पदांसाठी ही भरती होणार आहे. १ हजार ४४ एक्झिक्युटिव्ह आणि ५०० असिस्टंट मॅनेजर ग्रेड A पदांसाठी भरती केली जाईल. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ३ जूनपासून सुरू होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ जून २०२२ आहे. रिक्त पदांबद्दल अधिक तपशील खाली दिले आहेत. इच्छुक उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज करावा.
पात्रता
एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट मॅनेजर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी.
कार्यकारी पद
कार्यकारी पदांसाठी भरती एक वर्षाच्या करारावर केली जाईल, त्यानंतर कामगिरीच्या आधारावर ती आणखी वाढवली जाईल. ३ वर्षे पूर्ण झाल्यावर सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड A या पदासाठी उमेदवार पात्र असतील.
सहायक व्यवस्थापक ग्रेड ए
PGDBF 2022-23 मध्ये प्रवेशाच्या आधारावर असिस्टंट मॅनेजर ग्रेड A च्या पदांसाठी भरती केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना बँकिंग आणि फायनान्समधील एका वर्षाच्या पीजी डिप्लोमा कोर्स अंतर्गत प्रशिक्षित केले जाईल. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, बँक उमेदवाराची सहायक व्यवस्थापक ग्रेड A या पदावर नियुक्ती करेल.
वयोमर्यादा
कार्यकारी पदांसाठी उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२२ रोजी २० वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याच वेळी, साहाय्यक व्यवस्थापकासाठी उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
वेतन
पहिल्या वर्षी २९ हजार, दुसऱ्या वर्षी ३१ हजार आणि तिसऱ्या वर्षी ३४ हजार रुपये प्रति महिना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.