एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदांची भरती !

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदांची भरती! जाणून घ्या पदे व पगारीबाबत
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाSakal
Updated on
Summary

अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ती 30 नोव्हेंबरपर्यंत चालेल. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

सोलापूर : भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालयाने ( Airports Authority of India, Regional Headquarters - AAI) अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविले आहेत. AAI प्रादेशिक मुख्यालय, पश्‍चिम क्षेत्र यांनी ही भरती अप्रेंटिस अधिनियम 1961/2014 अंतर्गत प्रसिद्ध केली आहे. या रिक्त पदांतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि आयटीआय ट्रेड अप्रेंटिस उमेदवारांच्या पदांवर भरती (Recruitment) केली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ती महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत चालेल.

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया
पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी! डिसेंबरनंतर 13 हजार पदांची भरती

अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट @aai.aero वर जाऊन अर्ज करावा लागेल. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे, की त्यांनी अधिसूचना पूर्णपणे वाचल्यानंतरच अर्ज करावा, कारण अर्जामध्ये आढळलेल्या कोणत्याही विसंगतीमुळे त्यांचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.

रिक्त जागांचा तपशील

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस : 25 पदे

  • डिप्लोमा अप्रेंटिस : 38 पदे

  • ITI अप्रेंटिस : 27 पदे

जाणून घ्या शैक्षणिक पात्रता

ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्‍यक आहे. तर डिप्लोमा अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार संबंधित क्षेत्रात डिप्लोमा केलेले असावेत. याशिवाय आयटीआय ट्रेड अप्रेंटिसच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांकडे व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रमाणपत्र असणे आवश्‍यक आहे. त्याचवेळी या पदावरील उमेदवारांची निवड घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील टक्केवारीच्या आधारे केली जाईल. तर या पदांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करतेय उपव्यवस्थापक पदांची भरती!

असे असेल वेतन

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस : रु. 15,000

  • डिप्लोमा अप्रेंटिस : रु. 12,000

  • ITI ट्रेड अप्रेंटिस : 9,000

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()