नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजीमध्ये प्राध्यापकांची भरती!

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजीमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची भरती!
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजीमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची भरती!
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजीमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची भरती!esakal
Updated on
Summary

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजी (NIFT), नवी दिल्ली येथे सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या इच्छुकांसाठी नोकरीची संधी.

सोलापूर : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजी (National Institute of Fashion Technology - NIFT), नवी दिल्ली (New Delhi) येथे सरकारी नोकरीसाठी (Government Jobs) इच्छुक असलेल्या इच्छुकांसाठी नोकरीची संधी. भारत सरकारच्या (Government of India) वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या (Ministry of Textiles) अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजी (NIFT) ने देशभरातील विविध शहरांमध्ये असलेल्या 17 कॅम्पसमध्ये 190 सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजीमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची भरती!
इंडियन एअर फोर्समध्ये कमिशन्ड ऑफिसर्स पदांची भरती!

संस्थेने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार 190 पदांपैकी 77 अनारक्षित आहेत, तर 53 ओबीसी, 27 एससी, 14 एसटी आणि 19 ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी राखीव आहेत. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की NIFT सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. कराराचा कालावधी 5 वर्षांचा असेल आणि तो नंतर नियमित करता येईल.

असा करा अर्ज

NIFT सहाय्यक प्राध्यापक भरती 2022 साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार संस्थेच्या अधिकृत वेबसाइट nift.ac.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवारांना प्रथम अर्जाच्या पेजवर नोंदणी करावी लागेल आणि नंतर त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करून, उमेदवार त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतील. उमेदवारांनी नोंद घ्यावी, की NIFT सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया बुधवार, 8 डिसेंबरपासून सुरू झाली आहे आणि उमेदवार 31 जानेवारी 2022 पर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतील.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजीमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची भरती!
बॅंक ऑफ बडोदामध्ये आयटी प्रोफेशनल्सची भरती!

जाणून घ्या पात्रता

इच्छुक उमेदवार संबंधित विषयातील / भरतीच्या क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीधर असावेत आणि त्यांना संबंधित विषयातील अध्यापनाचा किंवा उद्योगाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. तथापि, पीएचडी उमेदवारांसाठी किमान एक वर्षाचा अनुभव आवश्‍यक आहे. याव्यतिरिक्त उमेदवारांचे वय 31 जानेवारी 2022 रोजी 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, सरकारी नियमांनुसार आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सूट देण्याची तरतूद आहे. अधिक तपशिलांसाठी NIFT सहाय्यक प्राध्यापक भरती 2022 अधिसूचना पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.