इंडियन एअर फोर्समध्ये कमिशन्ड ऑफिसर्स पदांची भरती!

इंडियन एअर फोर्समध्ये कमिशन्ड ऑफिसर्स पदांची भरती!
इंडियन एअर फोर्स
इंडियन एअर फोर्सesakal
Updated on
Summary

पदवीधर, B.Com, B.E. / B.Tech अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

सोलापूर : भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) AFCAT एंट्री (Air Force Common Admission Test) आणि NCC स्पेशल एंट्रीद्वारे सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी फ्लाइंग आणि ग्राउंड ड्यूटी (टेक्‍निकल आणि नॉन-टेक्‍निकल) ब्रॅंचमध्ये 317 कमिशन्ड ऑफिसर्स (Commissioned Officers) पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. पदवीधर, B.Com, B.E. / B.Tech अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज 30 डिसेंबर 2021 पूर्वी अर्ज करू शकता. पात्रतेसंबंधित माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहा. जाणून घ्या भरतीशी संबंधित माहिती.

इंडियन एअर फोर्स
बॅंक ऑफ बडोदामध्ये आयटी प्रोफेशनल्सची भरती!

या आहेत महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची तारीख : 1 डिसेंबर 2021

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2021

  • AFCAT 01/2022 ऑनलाइन परीक्षेची तारीख : 12, 13 आणि 14 फेब्रुवारी 2022

ही आहेत रिक्त पदे

  • AFCAT एंट्री (वायुसेना सामायिक प्रवेश परीक्षा) 01/2022 : 317 पदांची भरती केली जाईल.

  • NCC स्पेशल एंट्री : CDSE पदांपैकी 10 टक्के जागा

  • इतके असेल वेतन : 56100 - 110700 रुपये

परीक्षा शुल्क

AFCAT एंट्रीसाठी 250 रुपये अर्जाचे शुल्क असेल तर एनसीसी स्पेशल एंट्रीसाठी कोणतेही शुल्क नाही. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंग, ई-चलनद्वारे परीक्षाचे शुल्क भरू शकता.

इंडियन एअर फोर्स
बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी टॉप 5 मोठ्या पगाराचे करिअर पर्याय!

अर्ज व निवड प्रक्रिया

इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट careerindianairforce.cdac.in किंवा afcat.cdac.in वर 30 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी शारीरिक चाचणीद्वारे केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.