BSF कॉन्स्टेबल भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही आहे नोकरीची सुसंधी.
सोलापूर : बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या किंवा BSF कॉन्स्टेबल भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही आहे नोकरीची सुसंधी. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (Union Home Ministry) अंतर्गत सीमा सुरक्षा दल (Border Security Force - BSF) ने अभियांत्रिकी सेटअपमध्ये ASI, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. BSF ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार एकूण 72 पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी 32 पदे अनारक्षित आहेत तर उर्वरित 40 पदे EWS, OBC, SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.
असा करा अर्ज
BSF गट C भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झाली आहे आणि उमेदवार 29 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि उमेदवार BSF च्या अधिकृत भरती पोर्टल rectt.bsf.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रियेचे तीन टप्पे आहेत : एक वेळ नोंदणी, ऑनलाइन अर्ज भरणे आणि परीक्षा शुल्क भरणे.
पदनिहाय रिक्त पदांची संख्या
ASI (DM ग्रेड-3) : 1 पद
हेड कॉन्स्टेबल (कारपेंटर): 4 पदे
हेड कॉन्स्टेबल (प्लंबर) : 2 पदे
कॉन्स्टेबल (सिव्हरमन) : 2 पदे
कॉन्स्टेबल (जनरल ऑपरेटर) : 24 पदे
कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक) : 28 पदे
कॉन्स्टेबल (लाइनमन) : 11 पदे
जाणून घ्या पात्रता...
ASI (DM ग्रेड-3) : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून मॅट्रिक आणि ड्राफ्ट्समनशिपमध्ये डिप्लोमा.
हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल : मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र.
अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार सर्व पदांसाठी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, उच्च वयोमर्यादेत राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी शिथिलता दिली जाणार आहे. अधिक तपशिलांसाठी भरती अधिसूचना पाहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.