नॅशनल हाउसिंग बॅंकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार विविध पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.
सोलापूर : नॅशनल हाउसिंग बॅंक (National Housing Bank - NHB) ने विविध पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार डेप्युटी मॅनेजर, रिजनल मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी भरती करण्यात येत आहे. याअंतर्गत एकूण 17 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये सहाय्यक व्यवस्थापकाच्या 14 आणि उपव्यवस्थापकाच्या 1 पदाची भरती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रादेशिक व्यवस्थापकाच्या 1 पदाची भरती करायची आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 डिसेंबरपासून सुरू झाली असून, ती 30 डिसेंबर 2021 पर्यंत चालणार आहे.
अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्यांनी वेळेत अर्ज करावा; कारण अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर कोणतेही फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत साइट nhb.org.in वर जाऊन अधिकृत पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. अर्ज करताना फॉर्म नीट वाचा आणि त्यानुसार अर्ज करा.
'या' तारखा लक्षात ठेवा
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख : 1 डिसेंबर 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2021
स्केल I आणि II साठी ऑनलाइन परीक्षा : जानेवारी/फेब्रुवारी 2022
अशी आहे निवड प्रक्रिया
नॅशनल हाउसिंग बॅंकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार विविध पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2021 आहे. लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. तर परीक्षेसाठी कॉल लेटर परीक्षेच्या 10 दिवस आधी जारी केले जाईल. पोर्टलवर प्रवेशपत्र जारी केल्यानंतर उमेदवार अधिकृत पोर्टलवर कॉल लेटर डाउनलोड करू शकतील. यासोबतच उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेशपत्र अनिवार्य कागदपत्र असल्याने त्याची प्रिंटआउट काढून घेणे गरजेचे आहे.
सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे दरम्यान असावी. तर डेप्युटी मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 23 वर्षे ते 32 वर्षे आणि प्रादेशिक व्यवस्थापकासाठी वयोमर्यादा 30 ते 45 वर्षे यादरम्यान असावी. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.