नॅशनल हेल्थ मिशनमध्ये 'एएनएम'च्या 5000 पदांची भरती!

नॅशनल हेल्थ मिशनमध्ये 'एएनएम'च्या 5000 पदांची भरती!
नॅशनल हेल्थ मिशनमध्ये 'एएनएम'च्या 5000 पदांची भरती!
नॅशनल हेल्थ मिशनमध्ये 'एएनएम'च्या 5000 पदांची भरती!Canva
Updated on
Summary

राष्ट्रीय आरोग्य मिशन, यूपीद्वारे सहाय्यक परिचारिका (एएनएम) च्या पाच हजार पदांची भरती केली जाणार आहे.

सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य मिशन, यूपी (National Health Mission, UP) द्वारे सहाय्यक परिचारिका (Auxiliary Nurse Midwife - ANM) च्या पाच हजार पदांची भरती (Recruitment) केली जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशन, यूपीने या पदांसाठी अधिसूचना जारी करून अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली असून, इच्छुक व पात्र उमेदवार 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइट upnrhm.gov.in द्वारे अर्ज करू शकतात.

नॅशनल हेल्थ मिशनमध्ये 'एएनएम'च्या 5000 पदांची भरती!
नोकरीनिमित्त तरुण बनले 'पुणेरी सोलापूरकर'!

एएनएम पदांसाठी ही आहे पात्रता

सहाय्यक परिचारिका पदांसाठी उमेदवाराकडे राज्य सरकारच्या नर्सिंग कौन्सिलद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून सहाय्यक नर्सिंग आणि मिडवाईफमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा असावा.

असे आहे एएनएम पदांचे आरक्षण

  • सामान्य श्रेणी : 2484

  • ओबीसी श्रेणी : 1381

  • SC श्रेणी : 1066

  • एसटी श्रेणी : 69

  • ईडब्ल्यूएस : 463

अशी आहे वयोमर्यादा

सहाय्यक नर्सिंग आणि मिडवाईफ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा तीन वर्षे तसेच एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षे शिथिल आहे.

नॅशनल हेल्थ मिशनमध्ये 'एएनएम'च्या 5000 पदांची भरती!
वडिलांनी ज्यूस बार चालविले, पण मुलाला 'आयपीएस' बनविलेच!

असे मिळेल वेतन

राष्ट्रीय आरोग्य मिशन, यूपीने जारी केलेल्या सहाय्यक नर्सिंग आणि मिडवाईफ भरती अधिसूचनेनुसार, या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 12,128 रुपये प्रति महिना मानधन दिले जाईल. ही बाब नोंद करावी की, उमेदवारांची नियुक्ती कराराच्या आधारावर केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.