नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी ही एक नामी संधी आहे.
सोलापूर : इंडियन कोस्ट गार्ड (Indian Coast Guard) म्हणजेच भारतीय तटरक्षक दलाने नाविक जीडी (Sailor General Duty) आणि मेकॅनिकल (Mechanical) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नोकरीच्या (Jobs) शोधात असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी ही एक नामी संधी आहे. कारण, भारतीय तटरक्षक दलातर्फे एकूण 322 रिक्त पदांची भरती (Recruitment) करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार 4 जानेवारी 2022 पासून अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2022 आहे.
इच्छुक उमेदवारांनी नाविक जीडी व मेकॅनिकल पदांसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या joinindiancoastguard.cdac.in वर जाऊन अर्ज सादर करावा. 14 जानेवारीच्या आत उमेदवारांनी अर्ज सादर करावा, कारण मुदतीनंतर कुठलाही अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अशी आहे पदांची संख्या
नाविक जनरल ड्यूटीसाठी 260 रिक्त जागा भरल्या जाणार असून, नाविक डीबीसाठी 35 जागा तसेच मेकॅनिकल मेकॅनिकलसाठी 27 जागांसाठी भरती होणार आहे.
जाणून घ्या पात्रता
नाविक जीडी : या पदासाठी उमेदवार इंटरमिजिएट पास असावा. इंटरमिजिएटमध्ये भौतिकशास्त्र (Physics) किंवा गणित (Mathematics) विषय असणे आवश्यक आहे.
नाविक : या पदासाठी उमेदवार हा 10वी पास आणि डिप्लोमाधारक (Diploma) असावा.
वयोमर्यादा : या पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 22 वर्षे आहे.
निवड व परीक्षा शुल्क
स्टेज I, II, III आणि IV परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड होणार आहे. परीक्षा शुल्क सामान्य आणि ओबीसी (OBC) उमेदवारांसाठी 250 रुपये आहे. तर SC, ST उमेदवारांसाठी परीक्षा नि:शुल्क आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.