भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनी भरती!

भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनी भरती!
भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनी भरती!
भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनी भरती!Canva
Updated on
Summary

भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड (BEL) मध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी आहेत.

सोलापूर : भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड (Bharat Electronics Limited) (BEL) मध्ये सरकारी नोकरी (Jobs) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी आहेत. BEL ने मछलीपट्टनम युनिटसाठी मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनी (CMA/CA) च्या नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, विहित पदांसाठी निवड प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांची सुरवातीला एक वर्षासाठी नियुक्ती केली जाईल. तथापि, उमेदवाराच्या कामगिरीवर अवलंबून हा कालावधी एक वर्षासाठी वाढवता येऊ शकतो. नियुक्तीची मुदत जास्तीत जास्त दोन वर्षांपेक्षा जास्त असणार नाही.

भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनी भरती!
युनियन बॅंकेत सरकारी नोकरीची संधी! 3 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

असा करा अर्ज

पात्र उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाईट bel-india.in च्या भरती विभागात दिलेल्या लिंकवरून किंवा भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनी पदांसाठी खाली दिलेल्या थेट लिंकवरून भरती जाहिरात आणि अर्ज फॉर्म डाउनलोड करू शकतात. उमेदवारांनी हा अर्ज पूर्ण भरून आवश्‍यक कागदपत्रे जोडून 15 सप्टेंबर 2021 पर्यंत "द मॅनेजर (एचआर), भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड (बीईएल), रवींद्रनाथ टागोर रोड, मछलीपट्टनम -521001, कृष्णा, आंध्र प्रदेश' येथे जमा करणे आवश्‍यक आहे. अर्जाशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी उमेदवार BEL द्वारे जारी केलेला ई-मेल आयडी rectmc@bel.co.in वर मेल करून मदत मिळवू शकतात.

https://www.bel-india.in/Documentviews.aspx?fileName=English-Advertisement-30-08-2021.pdf या लिंकद्वारे पाहा भरती जाहिरात

https://www.bel-india.in/Documentviews.aspx?fileName=Application-Form-converted-30-08-2021.pdf या लिंकवरून अर्ज डाउनलोड करा

भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनी भरती!
सौरऊर्जेवर चालणार आता स्प्रिंकलर! 'ऑर्किड'च्या विद्यार्थ्यांचा आविष्कार

अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या पात्रता

भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडने व्यवस्थापन औद्योगिक प्रशिक्षणार्थी पदांसाठी जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी CA किंवा ICWA (इंटरमीजिएट) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. तसेच ICMA / ICAI यामध्ये नोंदणीकृत असणे आवश्‍यक आहे. तसेच, 1 ऑगस्ट 2021 रोजी उमेदवाराचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अशी होईल निवड...

उमेदवारांची लेखी परीक्षा / मुलाखतीच्या आधारे भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडमध्ये व्यवस्थापन औद्योगिक प्रशिक्षणार्थी पदांसाठी निवड केली जाईल.

शिष्यवृत्ती

विहित प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीच्या कालावधीत दरमहा 10,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()