SBI मध्ये ऑफिसर पदांसाठी निघाली मोठी भरती

SBI Recruitment 2021
SBI Recruitment 2021esakal
Updated on
Summary

स्टेट बँक ऑफ इंडियानं विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केलीय.

SBI Recruitment 2021 : स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) सर्कल बेस्ड ऑफिसर्स भरतीची नुकतीच अधिसूचना जारी केलीय. बँक (State Bank of India) या भरती मोहिमेद्वारे 1200 हून अधिक रिक्त पदं भरणार आहे. ज्या उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज 9 डिसेंबर 2021 पासून सुरू झाले आहेत, ते उमेदवार SBI sbi.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. तुम्ही 29 डिसेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीनं अर्ज करू शकता.

SBI CBO भरती 2021 तीन टप्प्यांच्या आधारे केली जाईल. यामध्ये लेखी परीक्षा, स्क्रीनिंग टेस्ट आणि मुलाखत यांचा समावेश आहे. या टप्प्यांच्या आधारे गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या उमेदवारांना बँकेत नोकरी मिळेल. लेखी परीक्षा जानेवारी 2022 मध्ये घेतली जाऊ शकते, ज्याचं प्रवेशपत्र जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अधिकृत वेबसाइटवर अपलोड केलं जाईल.

SBI Recruitment 2021
पोलिस कॉन्स्टेबलच्या २,४५० जागा; दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

रिक्त जागा (SBI CBO Vacancy 2021 Details)

  • SBI CBO नियमित रिक्त जागा - 1100 पदे

  • SBI CBO अनुशेष रिक्त जागा - 126 पदे

  • SBI बँकेतील एकूण रिक्त पदांची संख्या - 1226

SBI Recruitment 2021
इंडियन एअर फोर्समध्ये कमिशन्ड ऑफिसर्स पदांची भरती!

राज्यनिहाय रिक्त जागा

मध्य प्रदेश 162, छत्तीसगड 52, राजस्थान 104, कर्नाटक 278, तामिळनाडू 276 आणि गुजरातमध्ये 354 जागा रिक्त आहेत.

कोण अर्ज करू शकतो?

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील कोणत्याही प्रवाहातील पदवीधर उमेदवार SBI CBO जॉबसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय, स्थानिक भाषेचं उत्तम ज्ञान आवश्यक आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी अर्जदारांचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. तथापि, राखीव श्रेणीतील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल.

अर्ज फी

सामान्य, OBC किंवा EWS उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर इतर सर्व उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.