NHPC लिमिटेडमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
NHPC Limited मध्ये सरकारी नोकरी (Government Jobs) मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. NHPC ने प्रशिक्षणार्थी अभियंता (Trainy Engineer) आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी (Trainy Officer) या पदांच्या भरतीसाठी (Recruitment अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NHPC च्या अधिकृत वेबसाइट nhpcindia.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2022 आहे. (Recruitment of Trainee Engineer and Trainee Officer posts in NHPC Limited)
याशिवाय, उमेदवार http://www.nhpcindia.com/home.aspx या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, तुम्ही http://www.nhpcindia.com/writereaddata/Images/pdf/Gate2021_Eng.pdf या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 67 पदे भरली जाणार आहेत.
रिक्त जागांचा तपशील
प्रशिक्षणार्थी अभियंता (स्थापत्य) : 29 पदे
प्रशिक्षणार्थी अभियंता (यांत्रिक) : 20 पदे
प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रिकल) : 4 पदे
प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) : 12 पदे
प्रशिक्षणार्थी अधिकारी (कंपनी सचिव) : 2 पदे
जाणून घ्या पात्रता व निकष
अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता उमेदवारांकडे असावी.
नोंदणी शुल्क
सामान्य, EWS आणि OBC (NCL) श्रेणीतील उमेदवारांनी ऑनलाइन मोडद्वारे रुपये 295 (GST 18 टक्केसह) नॉन - रिफंडेबल शुल्क भरणे आवश्यक आहे. SC / ST / PWBD / सैनिक श्रेणीतील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही.
निवड प्रक्रिया
प्रशिक्षणार्थी अभियंता (सिव्हिल (Civil) / मेकॅनिकल (Mechanical) / इलेक्ट्रिकल (Electrical)), प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी (कंपनी सचिव) म्हणून GATE 2021 स्कोअर, CA / CMA स्कोअर आणि CS स्कोअरच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.