ESIC च्या विविध कार्यालयांत UDC, Steno अन्‌ MTS पदांची भरती!

ESIC च्या विविध क्षेत्रीय कार्यालयांत UDC, Steno अन्‌ MTS पदांची भरती!
ESIC
ESICesakal
Updated on
Summary

या ESIC भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees State Insurance Corporation - ESIC) ने त्यांच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांसाठी UDC Steno आणि MTS च्या पदांवर भरतीसाठी (Recruitment) पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. ESIC च्या या भरती अंतर्गत, दिल्ली (Delhi) मुख्यालयासह विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये भरती होणार आहे. ESIC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या ESIC भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे. (Recruitment of UDC, Steno and MTS posts in various field offices of ESIC)

ESIC
तुम्ही दहावी पास आहात? तुमच्यासाठी 'येथे' आहेत बंपर सरकारी नोकऱ्या!

जाणून घ्या पात्रता

  • ESIC भरती सूचनेनुसार, ऑफिस सुट्‌स (Office Suites) आणि डेटाबेसचे (Database) ज्ञान असलेले असे पदवीधर पास उमेदवार अप्पर डिव्हिजन क्‍लर्क (Upper Division Clerk - UDC) च्या पदांसाठी अर्ज करू शकतात.

  • तर बारावी उत्तीर्ण उमेदवार ज्यांचा लघुलेखन (Shorthand) वेग 80 शब्द प्रति 10 मिनिट आहे आणि त्याचे प्रतिलेखन इंग्रजीमध्ये 50 मिनिटे आणि हिंदीमध्ये 65 मिनिटे आहे ते स्टेनोग्राफच्या (Stenograph) पदासाठी अर्ज करू शकतात.

  • दहावी उत्तीर्ण उमेदवार देखील MTS पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे तर MTS साठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे आहे.

ESIC
NHPC मध्ये ट्रेनी ऑफिसर्स अन्‌ इंजिनिअर्स पदांच्या नोकऱ्या!

ESIC च्या या भरतीमध्ये प्रत्येक पदासाठी अर्जाच्या अटी भिन्न आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण भरती सूचना वाचावी. उमेदवार ESIC वेबसाइटवर प्रदेशनिहाय रिक्त जागांचा तपशील मिळवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.