अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयात सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी.
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयात (Ministry of Food Processing Industries) सरकारी नोकरी (Government Job) शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी. भारत सरकारच्या (Government of India) अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने पंतप्रधान फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस (Prime Minister's Formalization of Micro Food Processing Enterprises) योजनेसाठी विविध पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मंत्रालयाने 27 डिसेंबर 2021 रोजी अधिकृत वेबसाइट mofpi.gov.in वर जारी केलेली जाहिरातीनुसार विविध विभागांमध्ये लीड प्रोजेक्ट मॅनेजर (Lead Project Manager), मॅनेजर (Manager), फूड टेक्नॉलॉजिस्ट (Food Technologist), सल्लागार (Consultant) आणि यंग प्रोफेशनलच्या (Young Professional) एकूण 29 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. (Recruitment of young professionals and other posts in the Ministry of Food Processing Industries)
उमेदवारांनी नोंद घ्यावी, की ही पदे कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहेत. हा करार सुरुवातीला दोन वर्षांसाठी असेल तो पहिल्या सहा महिन्यांच्या प्रोबेशनसह. तथापि, विहित निवड प्रक्रियेद्वारे नियुक्त केलेल्या उमेदवारांचा कार्यकाळ मुदत संपल्यानंतर वाढवता किंवा कमी केला जाऊ शकतो, जो त्यांच्या कामगिरीच्या आधारावर निश्चित केला जाईल.
असा करा अर्ज
इच्छुक उमेदवार अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट mofpi.gov.in शी संबंधित भरती जाहिरात मेन पेजवरच दिलेल्या 'व्हॉट्स न्यू' विभागात दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरण्याची लिंक भरतीच्या जाहिरातीतच दिली आहे. या लिंकद्वारे उमेदवार आपला फॉर्म सबमिट करू शकतात. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2022 निश्चित केली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मंत्रालयातील अन्न प्रक्रिया उद्योग भरती 2022 ची जाहिरात पाहिली पाहिजे.
रिक्त पदांची संख्या आणि दरमहा पगार
लीड प्रोजेक्ट मॅनेजर (स्टेट प्रोग्राम) : 1 पद, 2.5 लाख रुपये
लीड प्रोजेक्ट मॅनेजर (कपॅसिटी बिल्डिंग) : 1 पद, 2.5 लाख रुपये
लीड प्रोजेक्ट मॅनेजर (प्लॅनिंग) : 1 पद, 2.5 लाख रुपये
लीड प्रोजेक्ट मॅनेजर (नॉलेज मॅनेजमेंट) : 1 पद, 2.5 लाख रुपये
लीड प्रोजेक्ट मॅनेजर (ब्रॅंडिंग आणि मार्केटिंग) : 1 पद, 2.5 लाख रुपये
व्यवस्थापक (स्टेट प्रोग्राम) : 1 पद, 1.45 लाख रुपये
व्यवस्थापक (कपॅसिटी बिल्डिंग) : 1 पद, 1.45 लाख रुपये
व्यवस्थापक (प्लॅनिंग) : 1 पद, 1.45 लाख रुपये
व्यवस्थापक (नॉलेज मॅनेजमेंट) : 1 पद, 1.45 लाख रुपये
व्यवस्थापक (ब्रॅंडिंग आणि मार्केटिंग) : 1 पद, 1.45 लाख रुपये
व्यवस्थापक (MIS) : 1 पद, 1.45 लाख रुपये
फायनान्शियल अँड क्रेडिट मॅनेजर : 1 पद, 1.45 लाख रुपये
कम्युनिकेशन मॅनेजर : 2 पदे, 1.45 लाख रुपये
फूड टेक्नॉलॉजिस्ट : 2 पदे, 1.45 लाख रुपये
व्यवस्थापक (एंटरप्राइज डेव्हलपमेंट) : 1 पद, 1.45 लाख रुपये
व्यवस्थापक (निरीक्षण आणि मूल्यमापन) : 1 पद, 1.45 लाख रुपये
सल्लागार - सहसचिव / संचालक स्तर : 1 पद, रु. 1.5 लाख / रु. 1 लाख
सल्लागार - वेतन आणि खाते स्तर : 1 पद, रु. 60 हजार
यंग प्रोफेशनल (मीडिया आणि पीआर) : 1 पोस्ट, रु. 60 हजार
यंग प्रोफेशनल (तांत्रिक) : 4 पदे, रु. 60 हजार
यंग प्रोफेशनल (व्यवस्थापन) : 4 पदे, रु. 60 हजार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.