Job Alert : भारतीय रेल्वेत २.८ लाख जागांवर भरती; तरुणांना मोठ्या प्रमाणावर मिळणार रोजगार

२०२३ पर्यंत रेल्वेमध्ये दीड ते दोन लाख रिक्त पदे भरली जातील, अशी अपेक्षा आहे.
Job Alert
Job Alertgoogle
Updated on

मुंबई : भारतीय रेल्वे (RRB) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. मंडळाकडून गट क आणि गट ड च्या २.८ लाख पदांवर लवकरच भरती केली जाईल.

अधिसूचना जारी केल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. अर्जाची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल. (recruitment on 2.8 lakh post in indian railway) हेही वाचा - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Job Alert
Job Alert : RECमध्ये विविध पदांवर भरती; ३ लाखांपर्यंत पगार घेण्याची संधी

यापूर्वी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत खासदार प्रमोद तिवारी यांच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले होते की बोर्डाकडून २.८ लाख पदांसाठी लवकरच भरती केली जाईल. त्यादृष्टीने मंडळाची तयारी सुरू आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्व २१ आरआरबींकडून रिक्त पदांची मागणी केली आहे. २०२३ पर्यंत रेल्वेमध्ये दीड ते दोन लाख रिक्त पदे भरली जातील, अशी अपेक्षा आहे. यामध्ये, गट ड आणि गट क संबंधित पदांवर पुनर्नियुक्ती केली जाईल. त्याची तयारी सुरू आहे.

Job Alert
SAIL Recruitment : आयटीआय उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; ३५ हजारांहून अधिक मिळणार पगार

वृत्तानुसार, मध्य रेल्वे यावर्षी २ लाखांहून अधिक पदांची भरती करणार आहे, ज्यामध्ये गट C आणि D पदांवर जास्तीत जास्त भरती केली जाईल. पूर्व, दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम विभाग वगळता प्रत्येक झोनमध्ये १० हजारांहून अधिक जागा रिक्त असतील.

याशिवाय मंडळ लवकरच अ आणि ब गटातील पदांसाठी भरती सुरू करणार आहे. ही भरती यूपीएससीच्या माध्यमातून केली जाणार आहे. २०२० पासून ग्रुप-ए आणि बी पदांची भरती झालेली नाही. मात्र, या दोन्ही भरतीच्या अधिसूचनेबाबत भारतीय रेल्वेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात भरतीची अधिसूचना निघू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वी रेल्वेकडून ग्रुप डीच्या १ लाखाहून अधिक पदांवर भरती करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()