REET परीक्षेत चक्क चप्पलात 'कॉपी'; 40 जणांना अटक

REET
REETesakal
Updated on
Summary

राजस्थानात शिक्षक भरतीसाठी आत्तापर्यंतची सर्वात मोठी परीक्षा नुकतीच राज्यभर घेण्यात आली.

जयपूर (राजस्थान) : राजस्थानात शिक्षक भरतीसाठी (Rajasthan Teacher Recruitment) आत्तापर्यंतची सर्वात मोठी परीक्षा (REET 2021) रविवार, 26 सप्टेंबर रोजी राज्यभर घेण्यात आली. या परीक्षेच्या कारणास्तव राजस्थानमध्ये रविवारी सकाळी 6 ते सायंकाळ 6 वाजेपर्यंत 12 तास इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. यामुळे राज्याच्या बहुतांश भागात दैनंदिन जीवन आणि ई-व्यवसायावर चांगला परिणाम जाणवला. मात्र, या परीक्षेदरम्यान आणखी एक प्रकार समोर आलाय. दरम्यान, विद्यार्थ्यांनी या परीक्षेला काॅपीचा अवलंब करत चक्क चप्पलाच्या सहाय्याने पेपर सोडला. तर, काहींनी चप्पलात ब्ल्यूटुथ (Bluetooth Device) वापरुन पेपर देण्यात धन्यता मानली. पण, ती फारकाळ टिकली नाही.

राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित रीट परीक्षेसाठी राज्यभरातील सर्व 33 जिल्ह्यांमध्ये 3993 परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आली होती. दोन सत्रात घेण्यात आलेल्या या परीक्षेला 16 लाख 51 हजार उमेदवार बसले होते. परीक्षेत उमेदवारांना कोणत्याही प्रकारे नक्कल करता येऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय करण्यात आले होते. रविवारी जयपूरसह अनेक जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. या परीक्षेत कॉपी करण्यासाठी ब्ल्यूटुथ उपकरण जोडलेल्या चप्पला घातल्याचे आढळल्यानंतर पाचजणांना बिकानेरमध्ये अटक करण्यात आली. तर, रीट परीक्षेशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी विविध ठिकाणांहून अन्य सातजणांना अटक करण्यात आलीय.

Bluetooth Device
Bluetooth Deviceesakal

दरम्यान, राजस्थान पोलिसांनी अनेक REET परीक्षार्थींसह विद्यार्थ्यांकडून चप्पलमध्ये लपवलेले ब्ल्यूटूथ डिव्हाइस जप्त केलेत, तर 40 लोकांना अटक केलीय. रविवारी दिवसभरात दोन डझनहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली. काहींनी या Bluetooth Device चप्पलसाठी 6 लाख रुपये मोजल्याचे समजते. दरम्यान, कडक सुरक्षा असूनही अशा आरईईटी विद्यार्थ्यांना रोखता न आल्याने पालकांतून नाराजीचा सूर उमटत असून प्रशासनावर कारवाईची मागणी केलीय. किशनगढ, अजमेर येथे एका उमेदवाराने ब्ल्यूटूथ डिव्हाइस त्याच्या स्लिपरमध्ये लपवून परीक्षा दिली असून त्यालाही अटक करण्यात आलीय. या टोळीचा म्होरका असलेला मुख्य आरोपी फरार आहे.

REET
या तालिबान्यांचा काही नेम नाही; आता विद्यापीठांत महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र 'शिफ्ट'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.