CBSE : 10 वी, 12 वी'चा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणार?

CBSE 10th & 12th Result
CBSE 10th & 12th Resultesakal
Updated on
Summary

आता बोर्ड थेट अंतिम निकाल जाहीर करणार आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Central Board of Secondary Education, CBSE) परीक्षा संपत असताना 30 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. इयत्ता 10 वी टर्म 2 च्या परीक्षा संपल्यामुळं मूल्यांकन प्रक्रिया सुरू असून 12 वी'च्या परीक्षा 15 जून पर्यंत चालू राहतील. या वर्षी CBSE नं दोन बोर्ड केले असून अंतिम निकालामध्ये टर्म 1 आणि टर्म 2 चा समावेश असणार आहे. (CBSE 10th & 12th Result)

टर्म 1 चा निकाल आधीच जाहीर झालाय. आता बोर्ड थेट अंतिम निकाल जाहीर करणार आहे. सीबीएसईनं यापूर्वी जूनअखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, अचूक तारखा न सांगता बोर्डानं म्हटलं होतं की, 'आम्ही वेळेत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सध्याच्या ट्रेंडनुसार, कॉलेज प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी इयत्ता 10 वीपूर्वी इयत्ता 12 वीचे निकाल जाहीर केले जातात.'

CBSE 10th & 12th Result
'मी सर्व काही गमावलंय; त्रिपाठी कुटुंबाला दोनच दिवसांपूर्वी मी मुंबई विमानतळावर सोडलं'

यंदा बोर्ड अनेक बाबींच्या आधारे अंतिम निकाल देणार आहे. CBSE नं मूल्यमापन केंद्रांची संख्याही वाढवलीय. प्रत्येक दिवशी तपासल्या जाणाऱ्या प्रतींची संख्या वाढवण्याच्या उद्देशानं अधिकाधिक शिक्षकांना तपासणी प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचं मंडळाचं नियोजन आहे. निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी प्रश्नपत्रिकांचे संच रंगीत असणार आहेत. म्हणजेच, एका व्यक्तीनं प्रत तपासल्यानंतर, ती मूल्यांकनकर्त्यांमध्ये आंतर तपासली जाईल. यामुळं एकूण किंवा चुकीच्या गणनेमध्ये कोणतीही चूक होणार नाही याची खात्री होईल. काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त केल्या जातील, असंही सीबीएसईनं म्हटलंय. तसेच विद्यार्थी टर्म 1 आणि टर्म 2 या दोन्ही वेळेस गैरहजर राहिल्यास बोर्ड विद्यार्थ्यांच्या निकालाची गणना करू शकणार नाही. अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षी परीक्षेला बसावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.