NATA 2021 Exam : राष्ट्रीय योग्यता चाचणीच्या (National Aptitude Test in Architecture) सुधारित तारखांची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. आर्किटेक्चर कौन्सिल, सीओएने (Council of Architecture, CoA) या संदर्भात घोषणा केलीय. त्यानुसार आता ही परीक्षा 11 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. NATA 2021 ची दुसरी टेस्ट 12 जून रोजी होणार होती, परंतु आता ती वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर आर्किटेक्चर कौन्सिलने (सीओए) या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशभर पसरलेल्या कोरोना (Coronavirus) विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे आणि NATA 2021 ची दुसरी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी, या निर्णयांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कौन्सिलने सांगितले आहे. (Revised Date Of National Aptitude Test in Architecture Exam Announced)
राष्ट्रीय योग्यता चाचणीच्या (National Aptitude Test in Architecture) सुधारित तारखांची नुकतीच घोषणा करण्यात आलीय.
NATA 2021 साठी जारी केलेल्या अधिकृत नोटिसमध्ये म्हटले आहे, की सुधारित NATA च्या महत्त्वाच्या तारखांसह माहितीपत्र अधिकृत वेबसाइटवर nata.in लवकरच जाहीर केले जाईल. दरम्यान, ऑनलाइन NATA अर्ज फॉर्म 2021 अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर NATA च्या दुसऱ्या टेस्ट परीक्षेस बसू इच्छिणारा कोणताही उमेदवार आता अर्ज सबमिट करू शकतो. यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. सीओएने कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून 10 एप्रिल रोजी NATA 2021 ची प्रथम परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ही परीक्षा देशभरातील 196 परीक्षा केंद्रातील दुबई, कतार आणि कुवेत येथे घेण्यात आली.
Revised Date Of National Aptitude Test in Architecture Exam Announced
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.