रोबोटिक्स इंजिनिअरिंग

माणसाचे काम कदाचित स्वयंचलित यंत्रमानव करू शकेल, अशी पूर्वी केवळ कल्पना होती. मागील दोन शतकांमध्ये विज्ञानाचा आधुनिक अविष्कार पाहायला मिळाला.
robotics engineering
robotics engineeringsakal
Updated on

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

माणसाचे काम कदाचित स्वयंचलित यंत्रमानव करू शकेल, अशी पूर्वी केवळ कल्पना होती. मागील दोन शतकांमध्ये विज्ञानाचा आधुनिक अविष्कार पाहायला मिळाला. तंत्रज्ञान विकसित होत गेले आणि त्याचा परिणाम म्हणून मानवी श्रमांचे रूपांतर टप्प्याटप्प्याने यंत्रांमध्ये होऊ लागले. आता तर बौद्धिक क्षमतेची कामेही यंत्रमानव म्हणजेच रोबोटमार्फत करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात रोबोटिक्स इंजिनिअरिंगला चांगला स्कोप असणार आहे.

शिक्षण

अभियांत्रिकीमधील रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या विषयातील बी.ई./बी.टेक. पदवी घेतल्यास थेटपणे याच कार्यक्षेत्रात काम करता येते. परंतु, या शाखेची उपलब्धता सर्वत्र नाही. तरीसुद्धा या करिअरमध्ये काम करण्यासाठी अन्य शाखादेखील पूरक ज्ञानाचे प्रशिक्षण देऊ शकतात. जसे की मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ई अँड टीसी, इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉडक्शन, कंप्युटर, आयटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, इंस्ट्रुमेंटेशन आदी शाखा. या शाखांमधील पदवीधर रोबोटिक्समध्ये काम करू शकतात.

पात्रता आणि प्रवेशपरीक्षा

बारावीमार्गे पदवी अभियांत्रिकी करणार असाल, तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्ससह बारावी सायन्स असणे ही शिक्षणाची अट आहे. या मार्गाने जाताना मेरिटप्रमाणे उत्तम स्कोअर आला, तर जेईई मेनद्वारे एनआयटी, ॲडव्हान्सडद्वारे आयआयटी, सीईटीद्वारे महाराष्ट्रातील महाविद्यालये या ठिकाणी बीई/बीटेकसाठी प्रवेश मिळतो. दहावीनंतर डिप्लोमाला थेट प्रवेश मिळतो.

विषय

सिग्नल प्रोसेसिंग, ऑटोमेशन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, डिझाइन, मशिन लर्निंग, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, मायक्रोप्रोसेसर, रोबोट प्रोग्रॅमिंग, रोबोट मॅन्युप्युलेटर्स, कंप्युटेशनल जिओमेट्री, रोबोट मोशन प्लॅनिंग आदी विषय अभ्यासक्रमात असतात.

पदे

रोबोट डिझाइन इंजिनिअर, रोबोटिक्स टेस्ट इंजिनिअर, रोबोटिक्स टेक्निशियन, रोबोटिक्स प्रोग्रामर, रोबोटिक्स सीस्टिम इंजिनिअर, रोबोटिक्स क्वालिटी ॲश्युरन्स इंजिनिअर, ऑटोमेशन इंजिनिअर अशा पदांवर काम करता येते.

करिअरचा स्कोप

झेरॉक्स मशीन, वॉशिंग मशीन, गाडी, विमान, मिक्सरपासून गुगल मॅप, चॅट जीपीटीपर्यंत अनेक गोष्टी विकसित तंत्रज्ञानामुळे शक्य झाल्या आहेत. टप्प्याटप्प्याने मानवी सहभाग कमी करून जास्तीत जास्त सहभाग रोबोटिक यंत्रणेचा असेल, अशी स्थिती इथून पुढच्या काळात असेल. स्वयंचलित यंत्रणा, तसेच सूचनांप्रमाणे तंतोतंत काम करणारी यंत्रणा म्हणजेच रोबोट असतात.

रोबोट म्हणजे एक प्रकारचे स्मार्ट मशीनच आहे. जिथे माणसाला काम करता येणे अशक्य आहे अशा ठिकाणी रोबोट वापरले जातात. जसे की आगीच्या किंवा अधिक तापमानाच्या ठिकाणी, धोकादायक कामांमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये रोबोट उपयुक्त असतात. ज्या ठिकाणी कामाची अचूकता अपेक्षित असते, कामे रीपिट पद्धतीने करावयाची असतात त्या ठिकाणी रोबोट किंवा ऑटोमेशनचा पर्याय वापरला जातो. औद्योगिक कामांमध्ये रोबोट स्वरूपातील ऑटोमेशनचे काम हल्ली केले जाते.

कस्टमर सर्व्हिस, वैद्यकीय क्षेत्र, सुरक्षा, फूड इंडस्ट्री, स्टोअर्स डिपार्टमेंट, इन्स्पेक्शन, ट्रान्स्पोर्ट अशा अनेक ठिकाणी रोबोटिक्स अँड ऑटोमेशनचे काम चालते. हल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून वर्गात मुलांना शिकविण्यासाठी रोबोट वापरता येतील असे संशोधन पूर्ण झाले आहे. नजीकच्या काळात स्वयंपाक करणारा, घर स्वच्छ करणारा, शेत नांगरणारा, गाडी चालवणारा रोबोट आपल्याला दिसेल. आगामी काळात हे तंत्रज्ञान विकसितच होत जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.