SAIL Recruitment 2021: नवी दिल्ली : स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया (Steel Authority of India) मध्ये वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या (Medical Specialist) रिक्त पदांवर भरती निघाली आहे. यानुसार ३९ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ९ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. त्यासाठी sailcareers.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहेत.
सेल भरती 2021 : रिक्त पदांचा तपशील
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - २५ पदे
वैद्यकीय तज्ज्ञ (Medical Specialist) - १४ पदे
शैक्षणिक पात्रता -
वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालयात एक वर्षाचा अनुभव असावा.
दुसरीकडे, मेडिकल ऑफिसर डेंटल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाची बीडीएस पदवी असणे आवश्यक आहे. मेडिकल स्पेशॅलिस्ट बायोकेमिस्ट्री या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमसीआय/डीसीआय मधून डेंटल, ईएनटी, गॉयनी किंवा रेडिओलॉजीची पदवी असावी.
मेडिकल स्पेशालिस्ट हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटर पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मेडिकल स्पेशालिस्ट पब्लिक हेल्थ पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून एमडी किंवा पीसीएम पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
यासंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहावी, असा सल्ला देण्यात येत आहे.
वय -
मेडिकल ऑफिसर जीडीएमओ आणि डेंटल पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३४ वर्षांपर्यंत असावे.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा
- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.