Sakal Vidya Education Expo : ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’त मोफत प्रवेश

विद्यार्थी अन् पालकांसाठी उद्यापासून भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन
Sakal Vidya Education Expo
Sakal Vidya Education ExpoSakal
Updated on

सोलापूर : ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’चा शनिवारी (ता.१५) सकाळी १० वा. हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात प्रारंभ होत आहे. या शैक्षणिक प्रदर्शनासाठी विद्यार्थी व पालकांना मोफत प्रवेश मिळणार आहे.

या शनिवार (ता.१५) व रविवार (ता.१६) या कालावधीत सकाळी १० ते ८ या वेळेत भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे. एक्स्पोमध्ये विद्यार्थ्यांच्या करियरच्या वाटा शोधण्यात मदत होण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध स्टॉलच्या माध्यमातून मिळणार आहे.

  • मार्च २०२४ मध्ये झालेल्या इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तम गुणांसह उत्तुंग यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

  • प्रदर्शनाच्या वेळी शनिवार (ता.१५) व रविवारी (ता.१६) सकाळी १० ते ८ या वेळेत भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांस लकी ड्रॉ द्वारे आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळेल.

सहभागी संस्था

  • एमआयटी, विश्‍वप्रयाग विद्यापीठ

  • मेलोडी टिचिंग करिअर पॉइंट

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

  • श्री सिद्धेश्वर वूमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर

  • नागेश करजगी आर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, सोलापूर

  • अलिफ ओव्हरसिज एज्युकेशन, सोलापूर

  • भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (बीगसी)

  • ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट

  • व्ही. व्ही. पी. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी सोलापूर

  • भवर राठोड डिझाइन स्टुडिओ (बीआरडीएस)

  • बीव्हीडीयू, पुणे अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड सोशल सायन्स, सोलापूर

  • एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर

  • ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर

सोलापूर शहर हे शैक्षणिक हब म्हणून नावारूपाला येत आहे. इंजिनिअरिंग, व्यवस्थापन औषध निर्माण, आर्किटेक्चर या व इतर क्षेत्रातील क्षेत्रातील विविध नामांकित महाविद्यालय सोलापुरात कार्यरत आहे. या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते.

परंतु अजूनही सोलापुरातले ब्रेन ड्रेन थांबलेले नाही. अजूनही विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी पुण्याकडे ओढा आहे. अशा वेळेस दैनिक ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या एज्युकेशन एक्सपोच्या माध्यमातून सोलापुरातील विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयातून उपलब्ध शिक्षणाच्या संधी याबाबत योग्य मार्गदर्शन मिळेल.

- डॉ. एस.बी सावंत, संचालक, भारती विद्यापीठ, अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड सोशल सायन्स

‘सकाळ’ राबविलेल्या उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. या प्रदर्शनातील स्टॉलमुळे सोलापूर परिसरातील चांगल्या कॉलेजची माहिती विद्यार्थी व पालकांना होणार आहे. कोणत्या महाविद्यालयात कोणत्या सोयी सुविधा आहेत. शिकविण्याच्या पद्धती कशा आहेत, याची इत्थंभूत माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. कॉमन ॲडमिशन प्रोसेस या प्रदेशमधून कॉलेजची निवड कशी करावी, याची माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे. राज्यात सुमारे ३५० महाविद्यालये आहेत. या सर्वच्या सर्व महाविद्यालयांना भेट देऊन माहिती घेणे अशक्य आहे. याकरिता या प्रदर्शनात एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध असणार आहे.

- डॉ. बी. के. सोनगे, प्राचार्य, एन. के. ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲड टेक्नॉलॉजी

बी. एम. आय. टी. अभियांत्रिकी महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा, विविध अभियांत्रिकी व व्यवस्थापन विषयांसाठी लागणाऱ्या विशेष प्रयोगशाळा, अत्याधुनिक उपकरणे, इंडस्ट्रीला लागणारे सॉफ्टवेअर, प्लेसमेंटच्या संधी, इंटर्नशिप संशोधनाच्या संधी उपलब्ध आहेत. आमचे अनुभवी प्राध्यापक अभियांत्रिकी शिक्षणाबरोबर करिअर बाबतचे समुपदेशनही करतात.

तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढावी याबाबत मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बीएमआयटी विचार मंथन या कार्यक्रमाद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञाद्वारे मार्गदर्शन केले जाते. मागील २० वर्षापासून बीएमआयटी संस्था संस्थेचे अध्यक्ष दिलीप माने यांच्या मार्गदर्शनखाली यशस्वी वाटचाल करीत आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचा निश्चितच लाभ होणार आहे.

- पृथ्वीराज माने, व्हाइस प्रेसिडेंट, बी.एम.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय

पार्टनर्स

आउटडोअर पार्टनर ः मिडिया वर्ल्ड, कम्युनिकेशन पार्टनर ः वेक अप सोलापूर, गिफ्ट पार्टनर ः अबिलिटी कन्स्ट्रक्शन, रेडिओ पार्टनर ः 92. 7 बिग एफएम

काय ?, केव्हा?, कधी ?, कुठे ?

  • काय ? : सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४

  • कधी? : शनिवार ता.१५ व रविवार ता.१६

  • केव्हा ? : सकाळी १० ते रात्री ८

  • कुठे ? : हुतात्मा स्मृती मंदिर प्रांगण, पार्क चौक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.