‘डिजि’साक्षर : ब्रॉडबॅन्डने पालटले चित्र!

मोबाईल डेटा आणि ब्रॉडबॅन्ड इंटरनेट हे कम्युनिकेशनचे प्राणवायू आहेत. भारतात साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वी ब्रॉडबॅन्ड इंटरनेट मिळू लागले.
Broadband
BroadbandSakal
Updated on
Summary

मोबाईल डेटा आणि ब्रॉडबॅन्ड इंटरनेट हे कम्युनिकेशनचे प्राणवायू आहेत. भारतात साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वी ब्रॉडबॅन्ड इंटरनेट मिळू लागले.

- समीर आठल्ये

मोबाईल डेटा आणि ब्रॉडबॅन्ड इंटरनेट हे कम्युनिकेशनचे प्राणवायू आहेत. भारतात साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वी ब्रॉडबॅन्ड इंटरनेट मिळू लागले. ब्रॉडबॅन्ड हे पूर्वीच्या डायल अप इंटरनेटपेक्षा प्रगत किंवा सुधारित तंत्रज्ञान आहे. यामध्ये इंटरनेटचा वेग डायल अप पेक्षा काही पटीने वाढतो. २००४च्या सरकारी आदेशानुसार ब्रॉडबॅन्डचा वेग कमीत कमी ५१२ kbps हवा. ट्रायने (TRAI) गेल्यावर्षी हा वेग कमीतकमी २ mbps असावा असे म्हणले आहे. बऱ्याच ब्रॉडबॅन्ड सेवा देणाऱ्या कंपन्या यापेक्षा जास्त वेगाने इंटरनेट सुविधा देत आहेत.

वाचकांच्या माहितीसाठी...

  • mbps म्हणजे मेगाबाइट पर सेकंद

  • kbps म्हणजे किलोबाइट पर सेकंद

  • 1 मेगाबाइट म्हणजे 1024 किलोबाइट

ब्रॉडबॅन्ड इंटरनेटचा पुरवठा ऑप्टिक फायबर, केबल, आपली नेहमीची फोन लाइन आणि वायफाय या चार मार्गाने होतो. यातील ऑप्टिक फायबर ब्रॉडबॅन्ड सर्वांत वेगवान असते. ऑप्टिक फायबर ८०० mbps पेक्षा जास्त वेगाने इंटरनेट पुरवठा करू शकते. आता बऱ्याच ठिकाणी जिओ फायबर आलेले आहे. ते फायबर म्हणजेच ऑप्टिक फायबर. केबलद्वारे किंवा टेलिफोन वायरमधून मिळणारं ब्रॉडबॅन्ड पण वेगवान असतं, मात्र ऑप्टिक फायबर इतके वेगवान नसते. चौथं म्हणजे वायफाय इंटरनेट. हे ब्रॉडबॅन्ड रेडियो सिग्नल वर चालतं, त्यामुळं हे वेगवान असतं पण त्या वेगाची नियमितता कमी जास्त असू शकते. हळूहळू यात पण सुधारणा झाली आहे आणि जगात काही ठिकाणी वायफाय ब्रॉडबॅन्ड ३०० mbps पेक्षा जास्त वेगाने इंटरनेट पुरवठा करू शकतं. ऑप्टिक फायबर व्यावसायिक वापरासाठी उपयोगी आहे. मोठमोठ्या संस्था जिथं इंटरनेट वापरणारे लोक जास्त आहेत आणि सर्वांना वेगवान इंटरनेटची गरज असते तिथं ऑप्टिक फायबर वापरतात. घरगुती वापरासाठी केबल किंवा फोनलाइनद्वारे मिळणारं इंटरनेट पुरेसं आहे. वायफायद्वारे मिळणारे ब्रॉडबॅन्ड सध्याच्या स्थितीत घरगुती आणि काही ठिकाणी कमी वेग चालू शकेल अशा व्यावसायिक ठिकाणी वापरले जाऊ शकते.

मोबाईल डेटाही एक प्रकारचे ब्रॉडबॅन्ड इंटरनेट आहे. भारतामध्ये मोबाईल डेटा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. मोबाईल डेटा म्हणजे वायरलेस पद्धतीने मोबाईल इंटरनेटला जोडणे. जगभरात भारतात जवळपास ८३ कोटी लोक वायर्ड किंवा मोबाईल ब्रॉडबॅन्ड इंटरनेट वापरतात. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची संख्या जगात फक्त चीनपेक्षा कमी आहे.

१९८६ मध्ये फक्त शैक्षणिक आणि संशोधन संस्थांसाठी चालू झालेलं इंटरनेट ९ kbps पासून आता घरोघरी १०० ते २०० mbps पर्यंत पोहोचलं आहे. कोविड काळात आपण घरी बसून काम करू शकलो आणि आपल्या नातेवाइकांना आणि मित्रांना व्हिडिओ कॉल्स करू शकलो ही सर्व या ब्रॉडबॅन्ड इंटरनेटची कृपा आहे.

भारताच्या प्रचंड लोकसंख्येमुळे जगात सर्वांत स्वस्त ब्रॉडबॅन्ड इंटरनेट उपलब्ध आहे. श्रीमंतातला श्रीमंत माणसाला आणि अगदी गरीब माणसाला कमीत कमी ब्रॉडबॅन्ड इंटरनेटमुळे तरी एका पातळीवर आणून ठेवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()