ऑनलाइन फॉर्म भरताना 'सातारा' जिल्हा मिसिंग

Satara Education Department
Satara Education Departmentesakal
Updated on
Summary

राज्यातील आठ हजार 555 शाळांमधील 94 हजार जागा रिक्त आहेत.

भिलार (सातारा) : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठीची प्रक्रिया शिक्षण विभागाने (Education Department) सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरताना ‘सातारा’ जिल्हा मिसिंग दिसत असल्याने पालक रोज फॉर्म भरण्यासाठी आटापिटा करताना दिसतात; परंतु ‘सातारा’ येत नसल्याने ही प्रक्रियाच थांबल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे.

या प्रवेशासाठी राज्यातील आठ हजार ५५५ शाळांमधील ९४ हजार ८२४ जागा रिक्त आहेत. दरम्यान, ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या ऑनलाइन फॉर्ममध्ये राज्यातील अनेक जिल्हे दिसत नसल्याने पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आरटीईनुसार (RTE) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्याप्रमाणे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या अंतर्गत पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Satara Education Department
Job Alert : Bank Of Baroda मध्ये मॅनेजर पदासाठी नोकरीची संधी

सातारा जिल्ह्यातील पाचगणी हे ठिकाण जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र असून, या ठिकाणी सुमारे ४० ते ४५ खासगी निवासी शाळा आहेत. देश-विदेशातून येथे शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांसाठी फीही मोठी आहे. ही फी येथील स्थानिक विद्यार्थ्यांना परवडत नाही. त्यामुळे अनेक पालक या २५ टक्के मोफत शिक्षण आरक्षणाचा आधार घेतात. या वेळी हा फॉर्म भरताना अनेकांचे डोळे ऑनलाइन प्रक्रियेकडे लागले आहेत; परंतु या फॉर्ममध्ये ‘सातारा’ जिल्हा ओपन होत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणाच्या शेकडो विद्यार्थी योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. तातडीने त्यात दुरुस्ती करून पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पाचगणीबरोबरच जिल्ह्यातील पालकांमधून होत आहे. या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दुरुस्ती लवकरच होईल व मुदतही वाढवून मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

Satara Education Department
Railway Job : सेंट्रल रेल्वेत ज्युनिअर टेक्निकल असोसिएट पदांसाठी करा अर्ज

मुलीच्या शिक्षणासाठी रोज ऑनलाइन केंद्रावर जातोय; परंतु त्या ठिकाणी ‘सातारा’ ओपन होत नसल्याने फॉर्म भरता येत नाही. त्यामुळे ही दुरुस्ती तातडीने करून पालकांना दिलासा द्यावा अन्यथा आम्हाला फी भरणे जिकिरीचे होणार आहे. मुदतवाढ मिळाल्यास पालकांसाठी फायदेशीर ठरेल.

- संदीप कदम, पालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()