NCR Recruitment 2021 : दहावी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; रेल्वेत 480 पदांसाठी भरती, 'असा' भरा ऑनलाइन अर्ज

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

सातारा : North Central Railway NCR Recruitment 2021 : उत्तर मध्य रेल्वेने (North Central Railway) विविध व्यापारांमधील अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार एकूण 480 पदांची नेमणूक करण्यात येणार आहे. यात फिटर वेल्डर मेकॅनिकसह इतर पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज देखील करू शकतात. उमेदवारांना महत्वाची सूचना अशी, की या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल असून त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज देखील भरु शकतात.

'या' तारखा लक्षात ठेवा

ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ : 20 मार्च 2021

ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2021

North Central Railway NCR Recruitment 2021 : अशा असतील रिक्त जागा..

फिटर - 266 पोस्ट

वेल्डर - 11 पोस्ट

मेकॅनिक - 84 पोस्ट

सुतारकाम - 11 पोस्ट

इलेक्ट्रीशियन - 88 पोस्ट

उत्तर मध्य रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त, उमेदवारांना एनसीव्हीटीशी संबंधित मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे व्यापारातील प्रमाणपत्र असावे. त्याचबरोबर या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षांदरम्यान असले पाहिजे. याशिवाय राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची सवलत असेल.

उमेदवारांना भरावी लागणार इतकी फी.. 

विविध ट्रेंडमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 170 रुपये फी भरावी लागेल. त्याचबरोबर 70 रुपये जीएसटी द्यावा लागेल. याशिवाय एससी / एसटी / शारीरिक अपंग आणि महिलांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.