सातारा : SSC Selection Post Phase 8 Result 2020 : मॅट्रिक, 10+2 व पदवी आणि उच्च स्तरासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल आज कर्मचारी निवड आयोगाने जाहीर केले आहेत. आयोगाने यापूर्वी 29 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या निकालाच्या अहवालानुसार, फेज VIII 2020 च्या संगणक-आधारित परीक्षेचा निकाल 9 एप्रिल 2021 रोजी जाहीर करण्यात आला. दरम्यान, एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 8 चा निकाल आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (ssc.nic.in.) जाहीर केला जाईल. तसेच, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे रोल नंबरही लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.
असा पहा एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 8 चा निकाल
मॅट्रिक, 10+2 व पदवी आणि उच्च स्तरासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल आज आयोगाने जाहीर केले आहे. या विद्यार्थ्यांचा रोल नंबर कमिशनच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतरच त्यांना निकाल आणि शॉर्टलिस्ट पाहता येणार आहे. यासाठी उमेदवारांना आयोगाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तिथे गेल्यावर होम पेजवर निकालाच्या लिंकवर क्लिक करावे. यानंतर, नवीन पृष्ठावर दिलेल्या विविध परीक्षांच्या टॅबमधून आपल्याला 'अन्य' टॅबवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्याला 9 एप्रिल 2021 रोजी प्रसिध्द झालेला निकाल पाहता येईल. तत्पूर्वी उमेदवारांनी संपूर्ण वेबसाइटची माहिती जाणून घेऊनच आपला निकाल पहावा. त्यानंतर पीडीएफ स्वरुपात खुल्या फाइलमध्ये त्यांचा रोल नंबर तपासावा.
नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आल्या परीक्षा
एसएससी सिलेक्शन पोस्ट 2020 ची अधिसूचना एसएससीने 21 फेब्रुवारी 2020 रोजी जारी केली होती. दरम्यान, अर्ज करण्याची प्रक्रिया 20 मार्चपर्यंत सुरु राहिली. त्यानंतर लेखी परीक्षा 6, 9 आणि 10 नोव्हेंबर 2020 रोजी देशभरातील अनुसूचित परीक्षा केंद्रांवर आणि 14 डिसेंबर रोजी बिहार राज्यातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यानंतर, एसएससीने 27 डिसेंबर 2020 रोजी फेज 8 संगणक आधारित परीक्षा 'अंन्सर की' निवड पोस्ट प्रसिद्ध केली, ज्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या. दरम्यान, एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 8 चा निकाल 2020 ची आज आयोगाकडून नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.