कामाच्या ठिकाणी तणाव वाढलाय?, मग 'हे' उपाय करा.. तणाव होईल कायमचा दूर

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

सातारा : सध्याच्या धावपळीच्या जगात कोणालाच कोणाकडे बघायला वेळ नाही, इतके सर्वजण आपापल्या कामांत व्यस्त आहेत. आपण आजूबाजूला पाहतो, अनेकजण कोणत्या ना कोणत्यातरी कारणारुन एकमेकांशी वाद घालत असतात. त्यांच्यात मोठ्या प्रमाणात भांडण सुरु असते. ऑफिसमध्येही बर्‍याच वेळा एखाद्या गोष्टीबद्दल लोकांमध्ये कलह निर्माण झालेला पहायला मिळतो. सहसा लोक रागावले, की ते दुसर्‍या व्यक्तीचा द्वेष करायला लागतात. यानंतर दोघांमधील अविश्वास आणि अंतर स्पष्टपणे दिसून येते. कार्यालयात लोकांमध्ये असंतोष असेल, तर यामुळे काम आणखीनच अवघड होते. कार्यालयात लोक एकमेकांच्या मदतीने वेळेत काम पूर्ण करू शकतात. परंतु जर एखादी व्यक्ती अस्वस्थ झाली, तर त्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करून काम पूर्ण करुन घ्यावे लागते. मनातील नकारात्मक भावनांमुळे काही गोष्टी नकारात्मकच दिसून येतात, त्यामुळे एकत्र काम करणारे लोक देखील आपल्या वागण्यावर प्रभावित होताना दिसतात.

ऑफिसमध्ये 'टेन्शन' घेऊ नका

जे लोक एकत्र काम करतात, त्यांची ऑफिसमधील कामाबद्दल वेगवेगळी भिन्न मते असू शकतात, त्यामुळे त्यांच्यात सहकार्याबद्दल नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. मात्र, सहसा असे पाहिले जात नाही. परंतु, एखाद्या गोष्टीबद्दल मतभेद असल्यास आणि ते वेळेत मिटवले गेले नाही, तर ते भविष्यात एक मोठे रूप घेऊ शकते. यामुळे कंपनीचे मोठे नुकसानही होऊ शकते. जर आपल्या संस्थेत आपल्याला असे वाटत असेल, की आपल्याशी वाढत जाणारा संघर्ष सुरु आहे, तेव्हा त्या संघर्षाला तिथेच समजोतातून मिटवण्याचा प्रयत्न करा.

मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करायचाय?, हे आहेत उत्तम पर्याय

'या' विषयांवर थेट बोला

जेव्हा एखाद्या गोष्टीवर विरोध होऊ लागतो, तेव्हा संबंधित व्यक्तीशी थेट बोलू लागा. आपण एखाद्या गोष्टीबद्दल नकारात्मक होत असल्यास, आपण ते उघडपणे सांगू शकता. हे आपल्याला विवादाचे निराकरण करण्याची चांगली संधी देईल आणि आपण गतिरोधातून बाहेर येऊ शकता. तसेच वातावरण सकारात्मक बनविण्यासाठीही कार्य करू शकता.

दुसर्‍या पक्षाचे म्हणणे सावधगिरीने ऐका..

जर आपण एखाद्या गोष्टीवर दुसर्‍या बाजूने विचार करत असाल, तर समोरच्या व्यक्तीचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. तसेच आपल्या संवादातून समोरच्या व्यक्तीला त्रास झाला असेल, तर त्याच्या म्हणण्याचा नेमका अर्थ समजून घ्या. जेणे करुन आपल्यातला तणाव कमी होण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर आपली बाजू मांडताना समोरच्या व्यक्तीचेही म्हणणे स्पष्टपणे ऐकून घ्या व आपल्यातल्या समस्येचे निराकरण करा.

सायन्समधून उत्तीर्ण झालाय? मग, मायक्रोबायोलॉजिस्ट व्हा; कारण यात आहेत करिअरच्या बर्‍याच संधी

मूलभूत मुद्द्यांवर सहमती दर्शवा

बर्‍याचदा अशा काही गोष्टी असतात, ज्यावर विरोधी पक्ष सहमत होण्यास तयारी दर्शवितो. त्या गोष्टींचा विचार करा, जेणेकरून आपण एखाद्या समस्येवर तोडगा काढण्यास प्रवृत्त होऊ शकता. हे आपल्यामधील अंतर कमी करेल आणि विवाद कमी करेल.

काही समस्या तडजोडीने सोडवा

एकत्र काम करत असताना दुसर्‍यांच्या काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्यातील चांगला संवाद वाढेल. तसेच संस्थेच्या बाबतीत सहकार्यांसमवेत संस्थेच्या हिताचे निर्णय घ्या, जेणे करुन संस्थेचा आपल्यावरती विश्वास वाढेल. तसेच, जेव्हा सर्व बाजूंनी स्वीकृती वाढते, तेव्हा नैसर्गिकरित्या ताणतणाव देखील कमी होतो. हे आपल्याला सकारात्मक आणि प्रवृत्त बनवते.

MPSC EXAM 2021 : राज्य सरकार आमच्या आयुष्याशी खेळतंय; विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रीयेवर पालकमंत्र्यांचे हे विधान

नकारात्मक गोष्टींचा सामना करा

नकारात्मक गोष्टींमुळे चिंतेत असलेल्या कारणांवर मात करण्याचा प्रयत्न करा. जर आपणास कशाचाही त्रास होत असेल, तर कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता आपला मुद्दा दुसर्‍यासमोर ठेवा. जोपर्यंत दोन्ही बाजूंनी एखाद्या गोष्टीची चर्चा होत नाही, तोपर्यंत एकमत होण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. अशा परिस्थितीत दोघांतील तणाव वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.