MPSC चा अभ्यास करताना 'या' गोष्टींकडे जास्त लक्ष द्या; परीक्षा होईल एकदम सोपी..

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

सातारा : तारीख पे तारीख म्हणत.. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 ही रविवार 21 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. आयोगाने संकेतस्थळावर यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे. दुसरीकडे, आंदोलनकर्त्या उमेदवार मात्र ही परीक्षा 14 मार्चलाच घेतली जावी, या मागणीवर ठाम आहेत. आयोगाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे, की ही परीक्षा 11 मार्चच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता रविवार 21 मार्च रोजी होणार आहे. उमेदवारांना 14 मार्च 2021 च्या परीक्षेसाठी जी प्रवेशपत्रे जारी केली होती, त्याच प्रवेशपत्रांच्या आधारे 21 मार्चच्या परीक्षेला प्रवेश देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission -MPSC) हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 315 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. याच्यातून उपजिल्हाधिकारी, पोलिस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी इत्यादी वर्ग-१ व वर्ग-२ ची पदे भरली जातात.

MPSC EXAM 2021 : राज्य सरकार आमच्या आयुष्याशी खेळतंय; विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रीयेवर पालकमंत्र्यांचे हे विधान

'या' पद्धतीने करा अभ्यास

  • अधिकारी हा समाजाच्या द़ृष्टीने विचार करणारा, तसेच सामाजिक बांधिलकी जपून कल्याणकारी निर्णय घेणारा असावा. यासाठी प्रत्येक उमेदवाराने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील घडामोडी यांचा अभ्यास करणे अपेक्षित असते. 
  • चालू घडामोडींचा अभ्यास हा कमी वेळेत व परीक्षाभिमुख करावा लागतो. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडे एक वेगळा द़ृष्टिकोन बाळगावा लागतो. 
  • चालू घडामोडींचा अभ्यास करताना सर्वच घडामोडींना सारखेच महत्त्व देणे उचित ठरत नाही. त्यासाठी परीक्षेच्या अभ्यासाला केंद्रबिंदू मानावे तसेच यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे निदर्शनास येते की, प्रश्नांचे दोन प्रकारात वर्गीकरण होते.

अ) सामान्य अध्ययन विषयासंदर्भातील प्रश्न.
ब) केवळ चालू घडामोडी संदर्भातील प्रश्न.

स्वीडनमध्ये 1300 वर्षांपूर्वीच्या रहस्यमय गोष्टीचा शोध; Gold Foil मध्ये दिसली मिठी मारणारी जोडपी

म्हणजेच, वर्तमानपत्राचे वाचन करताना सामान्य अध्ययन विषयांच्या मुद्द्यांशी सांगड करणे महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे याचा फायदा मुख्य परीक्षेमधील निबंध लेखन व शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत यासाठी होतो. नवीन उमेदवारांनी सर्वप्रथम प्रत्येक विषयांमधील मूलभूत संकल्पना समजावून घ्याव्यात. त्यानंतरच वर्तमानपत्र किंवा इतर स्रोतामधून चालू घडामोडींचा अभ्यास करावा. यामुळे उमेदवाराचा वेळ वाचतो व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुद्दा/संकल्पना योग्यरीत्या समजण्यास मदत होते व चालू घडामोडींकडे बघण्याचा स्पर्धात्मक द़ृष्टिकोन प्राप्त होतो. चालू घडामोडी या सर्वसाधारणपणे राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वरूपाच्या असतात. याचा परिणाम मुख्य परीक्षांच्या विषयांवर पडतो. 

तुम्हाला माहितीय? 15 व्या शतकातील चीनी कलाकृतीच्या Porcelain Bowl ची किंमत $500,000 डॉलर्स इतकी आहे!

महत्त्वाचे : कायदे, विधेयक, घटनादुरुस्त्या, महत्त्वाच्या परिषदा, संस्था, नवीन शोध, समित्या आयोग त्यांचे अहवाल, महत्त्वाची कलमे, आर्थिक घटना व आकडेवारी, न्यायालयीन निवाडे नवीन योजना अंमलबजावणी इत्यादी. याव्यतिरिक्त फक्त चालू घडामोडी संबंधित चर्चेतील व्यक्ती, नियुक्त्या, निधन वार्ता, ग्रंथ त्यांचे लेखक, पुरस्कार, क्रीडा इ. आणि अशाच प्रकारचे वर्गीकरण होय. यासाठी उमदेवारांनी दररोजच्या वर्तमानपत्राचे वाचन, महिन्यांची मासिके वापरावीत तसेच आठवड्याच्या दर रविवारच्या वर्तमानपत्रांमधील पुरवण्या वाचाव्यात. यामध्ये आठवडाभर घडलेल्या घटनांचा सविस्तर लेखाजोखा असतो. अशाप्रकारे अभ्यास केल्यास अभ्यासाला योग्य न्याय मिळून परीक्षेमध्ये योग्य गुण प्राप्त होतात. त्यामुळे येत्या 21 रोजीच्या परीक्षेला सामोरे जाण्यास विद्यार्थ्यांना सोपे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.