एसटीत कंत्राटी चालकांची भरती; प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाचा निर्णय

 ST Corporation Recruitment
ST Corporation Recruitment esakal
Updated on
Summary

राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्‍यांसाठी मागील चार महिन्यांपासून संप पुकारला आहे.

सातारा : गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ राज्य परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) कमचाऱ्यांचा संप सुरू आहे. सद्य:स्थितीत राज्यातील बहुतांशी आगारांत कर्मचारी पूर्ण क्षमतेने हजर झाले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर सातारा विभागीय कार्यालयाच्या वतीने ३८ कंत्राटी चालकांची भरती केली असून, अजून १२ चालकांची भरती करणार असल्याची माहिती महामंडळाच्या प्रशासनाने दिली आहे.

महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्‍यांसाठी मागील चार महिन्यांपासून संप पुकारला आहे. दिवाळीचा सण सुरू असताना संप सुरू झाल्याने अनेक चाकरमान्यांचे हाल झाले होते. महामंडळातील संघटनांनी राज्य शासनात विलीनीकरण ही मुख्य मागणी करून हा संप ताणला. त्यानंतर कर्मचारी संघटना व परिवहनमंत्र्यांनी तीन बैठका घेऊन सुमारे ४१ टक्के पगारवाढ केली. तरीदेखील कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण या मुद्यावर ठाम राहत संप सुरूच ठेवला. त्यानंतर महामंडळ प्रशासनाने कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत निलंबन केले.

 ST Corporation Recruitment
मणिपूरमधील 12 मतदान केंद्रांवर 5 मार्चला पुन्हा मतदान : निवडणूक आयोग

या कारवाईमुळे आगारांतील ५० टक्‍क्यांहून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले. त्यामुळे सलग दोन महिने बंद असलेली वाहतूक काही अंशी पूर्वपदावर येऊ लागली. मात्र, कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चालक व वाहकांची संख्या अल्प प्रमाणात आहे. साताऱ्यातील ११ आगारांमध्ये केवळ २० ते २२ टक्के चालक व वाहक हजर असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येताना खोळंबा होत आहे. अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे ग्रामीण भागातून शाळा, महाविद्यालये, नोकरीनिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी महामंडळ प्रशासनाने कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

 ST Corporation Recruitment
सरकारी नोकरीचं स्वप्न होणार पूर्ण; पोस्टात 'या' पदांसाठी भरती

‘‘प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी सद्य:स्थितीत ३८ चालकांची भरती केली आहे. तसेच भरतीची प्रक्रिया सुरू असून अजून १२ चालक भरले जाणार आहेत. जिल्ह्यातील आगारांतून अद्यापही पूर्ण क्षमतेने फेऱ्या सुरू नसल्याने कंत्राटी भरती केली जात आहे.’’

-ज्योती गायकवाड, वाहतूक अधिकारी, एसटी विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.