संस्थेची स्थापना १९२६ मध्ये झाली असून, ती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित आहे.
- सविता भोळे
आजच्या भागात महाराष्ट्रातील प्रसिद्ध मेडिकल इन्स्टिट्यूटबद्दल जाणून घेणार आहोत. ही संस्था आहे शेठ गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालय (मुंबई) म्हणजेच जीएस वैद्यकीय महाविद्यालय.
संस्थेची स्थापना १९२६ मध्ये झाली असून, ती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित आहे. दरवर्षी संस्थेमध्ये जवळपास दोन हजार विद्यार्थी हे पदवी, पदव्युत्तर; तसेच सुपर स्पेशालिटीच्या वैद्यकीय क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. नर्सिंग स्कूलही उपलब्ध करून देण्यात आले आहे. २२५० बेड्सच्या केईएम रुग्णालयाच्या माध्यमातून ३९० स्टाफ फिजिशियन्स व ५५० रेसिडेंट डॉक्टर्स रुग्णांची काळजी घेत असतात. भारतातीलच नाही, तर संपूर्ण आशियामध्ये अनेक गोष्टी सर्वांत पहिले सुरू करण्याचा मान संस्थेने मिळविला आहे. उदाहरणार्थ, ॲक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, न्यूट्रिशन संशोधन विभाग, इन्टेन्सिव्ह कार्डियाक केअर युनिट आदी. तसेच हे भारतातील पहिले महाविद्यालय आहे, जिथे ॲलोपॅथीसोबत आयुर्वेदिक रिसर्च सेंटर जोडलेले आहे आणि Indexed Medical Journal सुरू करणारे हे भारतातील पहिले महाविद्यालय आहे.
महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रम
१) एम.बी.बी.एस (MBBS)
कालावधी : ५ वर्षे ६ महिने
पात्रता : बारावी (५० टक्के गुणांसह)
प्रवेश परीक्षा : NEET UG
२) बी.पी.टी.
कालावधी : ५ वर्षे ६ महिने
पात्रता : बारावी उत्तीर्ण
प्रवेश परीक्षा : नाही
३) बी.ओ.टी.एच
कालावधी : ५ वर्षे ६ महिने
पात्रता : बारावी उत्तीर्ण
प्रवेश परीक्षा : नाही
४) एम.डी. (MD)
कालावधी : ३ वर्षे
पात्रता : एम.बी.बी.एस
प्रवेश परीक्षा : NEET PG
हा कोर्स विविध १८ विषयांमध्ये चालविला जातो.
५) एम.एस. (MS)
कालावधी : ३ वर्षे
पात्रता : एम.बी.बी.एस
प्रवेश परीक्षा : NEET PG
हा कोर्स सहा विषयांत उपलब्ध आहे.
६) डी.एम. (DM)
कालावधी : ३ वर्षे
पात्रता : MD
प्रवेश परीक्षा : NEET SS
हा कोर्स विविध ११ विषयांसाठी उपलब्ध आहे.
७) एम.सी.एच. (M.Ch.)
कालावधी : ३ वर्षे
पात्रता : एम.एस.
प्रवेश परीक्षा : NEET SS
हा कोर्स ६ विषयांमध्ये उपलब्ध आहे.
८) एम. एस. सी. (M.Sc)
कालावधी : २ वर्षे
पात्रता : त्या-त्या विषयातील पदवी
प्रवेश परीक्षा : नाही
हा कोर्स तीन विषयांत उपलब्ध आहे.
९) यु. जी. डिप्लोमा
कालावधी : १ किंवा २ वर्षे
पात्रता : बारावी उत्तीर्ण
प्रवेश परीक्षा : नाही
हा कोर्स २ विषयांमध्ये उपलब्ध आहे.
१०) पी.जी. डिप्लोमा
कालावधी : २ वर्षे
पात्रता : एम.बी.बी.एस. उत्तीर्ण
प्रवेश परीक्षा : NEET PG
हा अभ्यासक्रम ९ विषयांत उपलब्ध.
अधिक माहितीसाठी www.kem.edu या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.