औरंगाबाद, नाशिकसह 'या' केंद्रांवरील 'SBI'ची लिपिक परीक्षा ढकलली पुढे

SBI Clerk Prelims Exam
SBI Clerk Prelims Examesakal
Updated on

SBI Clerk Prelims Exam Date 2021 Postponed : स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) काही अपरिहार्य परिस्थितीमुळे शिलॉंग, अगरतला, औरंगाबाद (महाराष्ट्र) आणि नाशिक केंद्रांवर होणाऱ्या कनिष्ठ असोसिएट्स पदाची (Clerk Prelims Exam) प्राथमिक परीक्षा पुढे ढकललीय. ज्या उमेदवारांनी SBI Clerk 2021 Prelims साठी अर्ज केला आहे, अशा उमेदवारांना बँकने अधिकृत वेबसाइटला भेट देऊन माहिती तपासण्याचे आवाहन केले आहे. (SBI Clerk Prelims Exam Date 2021 Postponed Junior Associate Clerk New Dates Soon At sbi co in)

Summary

बँकेने 10 ते 13 जुलै 2021 पर्यंत शिलॉंग, अगरतला, औरंगाबाद (महाराष्ट्र) आणि नाशिक केंद्रांवर होणाऱ्या कनिष्ठ असोसिएट्स पदाची प्राथमिक परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय.

अधिकृत माहितीनुसार, बँकेने 10 ते 13 जुलै 2021 पर्यंत शिलॉंग, अगरतला, औरंगाबाद Aurangabad (महाराष्ट्र) आणि नाशिक (Nashik) केंद्रांवर होणाऱ्या कनिष्ठ असोसिएट्स पदाची प्राथमिक परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून या केंद्रांच्या परीक्षेची सुधारित तारीख लवकरच कळविण्यात येणार असल्याचे बॅंकेने आपल्या नोटिसीत स्पष्ट केलेय.

SBI Clerk Prelims Exam
SBI बँकेची मेगाभरती रद्द; परीक्षार्थींना फी मिळणार परत!

प्रारंभिक परीक्षेसाठी शिलॉंग, अगरतला, औरंगाबाद (महाराष्ट्र) आणि नाशिक केंद्रे दिलेल्या उमेदवारांना, त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी / मोबाइल क्रमांकावर मेल व एसएमएसद्वारे या संदर्भात माहिती देण्यात आलीय. इतर परीक्षा केंद्रांसाठी वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात येणार आहे. बँकेने यापूर्वीच SBI Clerk Prelims Admit Card 2021 आपल्या वेबसाइटवर अपलोड केले आहे. दरम्यान, सर्व उमेदवारांना 13 जुलैपूर्वी ती प्रवेशपत्रे डाउनलोड करण्याचे आवाहनही बँकेकडून करण्यात आलेय.

SBI Clerk Prelims Exam Date 2021 Postponed Junior Associate Clerk New Dates Soon At sbi co in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()