पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा अभ्यासक्रम; वाचा सविस्तर

पर्यावरण विभागाने तयार केलेला अभ्यासक्रम शिक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द
Syllabus
Syllabussakal media
Updated on

मुंबई : शालेय शिक्षण विभागाच्या (School education board) अंतर्गत येत असलेल्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांतील (First to Eight standard school) विद्यार्थ्यांना 'माझी वसुंधरा' या नावाने पर्यावरणाचा अभ्यासक्रम (Environment syllabus) शिकवला जाणार आहे. यासाठी आज पर्यावरण विभागाने तयार केलेला हा अभ्यासक्रम शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याकडे सुपूर्द केला.

Syllabus
Sakal Impact : "सुधारित दरपत्रकानुसार रिक्षाभाडे आकारा व कारवाई टाळा"

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या अभ्यासक्रमाची पुस्तके शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात सुपूर्द केली.यावेळी ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे महासंचालक जयराज फाटक, युनिसेफचे राजलक्ष्मी, शयुसूफ, माझी वसुंधराचे अभियान संचालक सुधाकर बोबडे आणि शिक्षण व पर्यावरण विभाचाचे सचिव आदी उपस्थित होते.

राज्य पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि युनिसेफच्या साहाय्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझी वसुंधरा’ हा अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्यभरातील पर्यावरण तज्ञ आणि विविध अभ्यासकांची मदत घेण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम लागू करण्यापूर्वी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून मान्यता घेतली जाणार आहे. त्यानंतर हा शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Syllabus
Sakal Impact : "सुधारित दरपत्रकानुसार रिक्षाभाडे आकारा व कारवाई टाळा"

दरम्यान, हा अभ्यासक्रम स्वीकारल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शिक्षण म्हणजे केवळ शालेय अभ्यासक्रम नसून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक घडविणे याला अधिक महत्त्व आहे. वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी पर्यावरण विभागाने अतिशय उपयुक्त अभ्यासक्रम तयार केला असून शालेय शिक्षण विभाग त्याची कालबद्ध अंमलबजावणी करून आपली जबाबदारी निश्चित पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वातावरणीय बदलांविषयी भावी पिढीला जागरूक करण्यासाठी शालेय अभ्यासक्रम हा त्यातील अत्यंत उपयुक्त उपक्रम ठरेल. शालेय शिक्षण विभागामार्फत नववीपासून पुढे असा अभ्यासक्रम यापूर्वीच शिकविला जातो. आता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी नवीन अभ्यासक्रम मोलाचा ठरेल असेही त्या म्हणाल्या.

माझी वसुंधरा हा अभ्यासक्रम आणि त्यांची पुस्तके शिक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द करताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, वातावरणीय बदल ही आता जागतिक समस्या बनली असून ती प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचली आहे. यावर मात करण्यासाठी शासन विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला अभ्यासक्रम हा त्याचाच एक भाग असून विद्यार्थ्यांना बालपणापासूनच वातावरण बदलांविषयी तसेच त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी माहिती होणे अत्यावश्यक आहे.

वातावरणीय बदलांचे परिणाम ही गंभीर बाब बनली असून त्यापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर ही समस्या रोखण्यासाठी समाजातील प्रत्येकाने आजपासूनच कृती करणे आणि पर्यावरणपूरक सवयी अंगिकारणेही गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

काय आहे अभ्यासक्रम

जैवविविधता संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन आणि वैयक्तिक आणि समुदाय आरोग्य, जलस्रोत व्यवस्थापन, ऊर्जा, वायू प्रदूषण आणि वातावरण बदल या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. ‘माझी वसुंधरा अभियान’, इलेक्ट्रीक वाहन धोरण, 43 अमृत शहरांचा कार्बन न्युट्रॅलिटीकडे प्रवास आदी उपक्रमांची माहिती देऊन एक वर्षापूर्वी युनिसेफसोबत केलेल्या करारानुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकातून सोबतच प्रत्यक्ष माहितीच्या आधारे हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.