Indian Army : भारतीय लष्करात भरती होण्याचा मार्ग मोकळा

Indian Army
Indian Armyesakal
Updated on
Summary

शाळेत नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीच्या प्रवेश परीक्षेची तयारी विद्यार्थी करू शकतात.

लष्करात करिअर (Indian Army) करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी दिल्लीत आर्म्ड फोर्स प्रीपरेटरी स्कूल (Armed Forces Preparatory School) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 2022-23 या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू होऊ शकते. दरम्यान, इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेऊन सैन्यात भरती होण्यासाठी तयारी करू शकतात.

Indian Army
पीएमएसएस अंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

स्कूल ऑफ स्पेशलाइज्ड एक्सलन्स (School of Specialized Excellence) अंतर्गत चालणारी ही शाळा दिल्ली बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनशी Delhi Board of School Education (DBSE) सलग्न आहे. विद्यार्थ्यांची शाळेत सायकोमेट्रिक आणि अभियोग्यता चाचणीच्या आधारे निवड केली जाईल. तसेच विद्यार्थ्यांचे स्क्रिनिंगही केले जाणार आहे. शिवाय, शाळेची तीन स्वतंत्र विभागांत विभागणी केली जाईल. यात शैक्षणिक विभाग, सेवा विभाग आणि प्रशासकीय विभाग असणार आहे. शाळेतील नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (National Defense Academy) आणि नेव्हल अॅकॅडमीच्या प्रवेश परीक्षेची तयारी विद्यार्थी करू शकतात.

Indian Army
SET Exam : महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर

सशस्त्र सेना प्रीपरेटरी स्कूलचे प्रकल्प प्रमुख हे माजी सैनिक असतील. याशिवाय निवृत्त लष्करी अधिकारी, विषयतज्ज्ञ, लष्करी कवायती प्रशिक्षक, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक इत्यादी अनेक पदांवर भरती केली जाणार आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट सध्याच्या दिल्लीतील सरकारी शाळेवर आर्म्ड फोर्सेस प्रीपरेटरी स्कूलची (AFPS) योजना आखेल. मुला-मुलींसाठी पूर्णतः निवासी शाळा स्थापन करण्यात येणार असून आर्म्ड फोर्सेस प्रीपरेटरी स्कूल (AFPS) चालवण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट एजन्सीची निवड केली जाईल. तसेच विस्ताराची गरज भासल्यास त्यासाठी नवीन आराखडा तयार केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()