गेली जवळपास दोन वर्ष संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट होते. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुद्धा येऊन गेली आहे. अनेक देशांमध्ये पूर्ण लॉकडाऊन होते. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोना व लॉकडाऊनचे गंभीर परिणाम झाले आहेत. पण सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वाधिक नुकसान हे विद्यार्थी वर्गांचे झाले आहे. जवळपास दोन वर्ष शाळा बंद असून, सर्व शिक्षण ऑनलाईन सुरु आहे. ऑनलाईन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत १०० टक्के यशस्वी पोहोचण्यात अनेक अडचणी आहेत.परिस्थिती हळू - हळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे भारतातील शाळा टप्प्याटप्याने सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासन व पालकांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी ही माहिती जाणून घेऊया.
सजग पालक म्हूणन आपल्या मुलाची खालील प्रकारे काळजी घ्यावी...
१. आपण वास्तव्य करत असलेला परिसर जर कंटेनमेंट झोनमध्ये येत असेल तर पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये.
२. मुले आजारी असतील तर त्यांना शाळेत पाठवू नये.
३. मुलांना वारंवार हात धुणे (सॅनिटायझरचा व मास्कचा वापर कसा करावा) याबद्दल मुलांना घरी प्रशिक्षण द्यावे.
४. वर्गात प्रत्येक मुलांमध्ये किमान ६ फूट अंतर ठेवून बोलावे , एकमेकांना स्पर्श करू नये तसेच आपला लंच बॉक्स , वॉटर बॉटल व शैक्षणिक साहित्य इतर मुलांना शेअर करू नये इत्यादी मुलांना सूचना कराव्यात.
५.मुळात तोंडावरचा मास्क काढू नये , तसेच शाळेत इतर कोणत्याही वस्तूला हात लावू नये , सतत तोंडाला, डोळ्यांना हात लावू नये अशा मुलांना सूचना कराव्यात.
६. शाळेतून आल्यानंतर मुलांची स्कूल बॅग निर्जंतुकीकरण करावी. तसेच शाळेचा गणवेश रोज स्वच्छ करावा.
७. मुलांच्या शरीराचे तापमान व ऑक्सिजन पातळी रोज तपासावी , शंका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
८. मुलांना रोज जीवनसत्वयुक्त ताजा व गरम आहार द्यावा तसेच बाहेरील उघड्यावरील पदार्थ देऊ नये.
शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खालील प्रमाणे काळजी घ्यावी...
१. विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याची सक्ती करू नये.
२. पालकांची लेखी परवानगी असल्याशिवाय विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देऊ नये.
३.शाळा जर कंटेनमेंट झोनमध्ये येत असेल तर शाळा सुरु करू नये.
४. शाळांना आपत्कालीन टास्क फोर्स तयार करावा.
५. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मास्क व सॅनिटायझर चा सतत वापर करावा.
६. शाळा प्रशासनाने शाळेतील प्रत्येक वस्तू सॅनिटाईज करावी. उदा. शाळांमधील प्रयोगशाळा, ग्रंथालय, वर्ग, शौचालय, फर्निचर, पाण्याची टाकी इत्यादी.
७. शाळा प्रशासनाने शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची तपासणी करावी (शरीराचे तापमान व ऑक्सिजन लेव्हल)
८. दोन विद्यार्थ्यांमध्ये ६ फुटाचे अंतर ठेवून, विद्यार्थ्यांना शाळेत बसवावे.
९. विद्यार्थी एकमेकांमध्ये मिसळणार माहिती याची शाळा प्रशासनाने काळजी घ्यावी.
१०. विद्यार्थ्यांना व्यक्तिगत स्वच्छतेच्या सवयींचे प्रशिक्षण द्यावे.
अधिक माहितीसाठी तुम्ही sakal relief fund या साईटला भेट देऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.