शाळांकडून २ कोटी, ९८ लाख दंड वसूल करण्याचे आदेश

विशेष पट पडताळणी मोहिमेत कमी उपस्थिती आढळलेल्या शाळांविरुध्द कारवाई करण्यात येत आहे.
School
Schoolesakal
Updated on

जालना : राज्यात अकरा वर्षांपूर्वी विशेष पट पडताळणी मोहिमेत कमी उपस्थिती आढळलेल्या शाळांविरुध्द कारवाई करण्यात येत आहे.राज्यातील ७८० शाळांना नोटीसा देण्यात आल्या असून २८२ दोषी शाळांकडून दंड रक्कम वसूल केली जाणार आहे. चार दिवसांत २ कोटी ९८ लाख ७६ हजार ८३ रुपये शासनाकडे भरावे लागणार, हे विशेष. राज्यात अकरा वर्षांपूर्वी म्हणजे ३ ते ५ ऑक्टोबर २०११ दरम्यान विशेष पटपडताळणी मोहिम राबविण्यात आली होती. सदर मोहिमेत राज्यातील जवळपास ७८० शाळांना कमी उपस्थिती आढळून आल्याने कारवाई करण्यात आली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench Of Bombay High Court) येथे एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. (Schools Should Give Fine Amount To Government)

School
'राऊत साहेब ! राज्य सरकारच्या नाकर्त्यापणामुळे देशात सर्वाधिक कोरोना बळी'

सदर याचिकेनुसार सुनावणीत दोषी शाळांकडून वसूलपात्र रक्कम वसूल करण्यात येत आहे. राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शाळांना बुधवारी (ता.नऊ) आदेश जारी केले आहेत. राज्यात १ हजार ४०४ शाळा (School) आढळून आलेल्या होत्या. यापैकी ७८० शाळांना नोटीसा बजावण्यात आल्या असल्याचे सदर आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील २८२ दोषी शाळा असून संबंधित शाळांकडून वसूल न झालेली रक्कम २ कोटी ९८ लाख ७६ हजार ८३ रुपये इतकी आहे. राज्यातील शाळांची वसूल रक्कम येत्या १४ फेब्रुवारीपूर्वी वसूलपात्र रक्कम वसूल करून चलनासह भरण्यात यावी, असे आदेशही संचालक यांनी शिक्षण विभागातील (Education Department) अधिकारी वर्गाना दिले आहेत. शाळांकडील वसूलपात्र रक्कम ४ कोटी १४ लाख ६४ हजार २०८ इतकी आहे. यातील २ कोटी ९८ लाख ७६ हजार ८३ रुपये अद्याप वसूल झालेले नाहीत.

School
Online Education समजलेच नाही! दहावी-बारावीचे जादा तास सुरू

मराठवाडा : दोषी शाळा

जिल्हा शाळा संख्या

औरंगाबाद ००

जालना ०८

परभणी ११

लातूर २३

नांदेड २४

उस्मानाबाद ०८

बीड १४

हिंगोली ०२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()