CET Exam Result : सेजल राठी सीईटी परिक्षेत महाराष्ट्रात प्रथम

राज्य सामाईक प्रवेश परिक्षेचा (एमचटी-सीईटी) निकाल घोषित झाला असून या परिक्षेत १०० पर्सेंटाईल गुण मिळवत पुण्याच्या सेजल राठी या विद्यार्थीनीने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळविला.
Sejal Rathi
Sejal Rathisakal
Updated on

कात्रज - राज्य सामाईक प्रवेश परिक्षेचा (एमचटी-सीईटी) निकाल घोषित झाला असून या परिक्षेत १०० पर्सेंटाईल गुण मिळवत पुण्याच्या सेजल राठी या विद्यार्थीनीने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळविला आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) या गटात तिने १०० पर्सेंटाईल गुणप्राप्त केले आहेत.

शेजल ही कात्रजमधील चाटे शिक्षण समूहाच्या संत तुकाराम इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची विद्यार्थीनी आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतर चाटे शिक्षण समूहातर्फे तिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी सेजलसह अपूर्वा चांदगुडे, आर्यन सूर्यवंशी, मानसी जोग, संकेत शिंदे, सोनल बैरागी, वैभवी पलांडे, सुमैया पिरजादे, दर्शन गिलबिले, सिद्धी शेलार, प्रज्वल कदम या यशस्वी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. पुढचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी बारावीच्या परीक्षेचा व सीईटी, जेईई व नीट अशा परिक्षेत कसा अभ्यास करावा आणि यश कसे संपादन करावे याबाबत सेजलने मनोगत व्यक्त केले.

Sejal Rathi
MHT-CET Exam Result : एमएचटी सीईटीत पुण्याचेच वर्चस्व

यावेळी चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक फुलचंद चाटे यांनी सेजलसह अन्य विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे एका वर्षाचे नसून विद्यार्थ्यांनी गेल्या दोन वर्षापासून सतत अभ्यासामध्ये मग्न राहून ध्येय ठरवून केलेल्या अभ्यासाचे यश आहे. सेजलसोबत आम्ही आठवीपासून असून तिने पहिल्यापासूनच आपले ध्येय ठरवले होते, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाला चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष गोपीचंद चाटे, विभागीय संचालक फुलचंद चाटे, प्रा. विजय बोबडे यांच्यासह सर्व शाखांचे व्यवस्थापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Sejal Rathi
ITI Admission : ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू

प्रतिक्रिया

मी आठवीपासून कात्रजच्या चाटे स्कूलची विद्यार्थीनी आहे. सीईटीचा अभ्यास करताना क्लासेस करत अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले. क्लासेसवरुन आल्यानंतर जास्तीत जास्त वेळ अभ्यासावर लक्ष केंद्रत करण्यावर माझा भर असे. माझे खरे लक्ष हे नीट हे आहे. या यशामध्ये माझे शिक्षक, प्राध्यापक चाटे सर यांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचा खूप मोठा आधाराचा वाटा आहे. आई-वडिलांनी तर मला कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही.

- सेजल राठी, विद्यार्थीनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.