Shivaji University : पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! शिवाजी विद्यापीठानं 'हा' नियम रद्द करत घेतला मोठा निर्णय

राज्यात नवे शैक्षणिक धोरण राबविण्यात शिवाजी विद्यापीठाने (Shivaji University) आघाडी घेतली आहे.
Shivaji University Kolhapur
Shivaji University Kolhapuresakal
Updated on
Summary

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने बदलणे आवश्यक असल्याने विद्यापीठाकडून हे दंडक रद्द करण्याबाबतची कार्यवाही आता पूर्ण झाली आहे.

Kolhapur News : राज्यात नवे शैक्षणिक धोरण राबविण्यात शिवाजी विद्यापीठाने (Shivaji University) आघाडी घेतली आहे. यापूर्वीच्या विद्यापीठ कायद्यांनुसार अस्तित्वात आलेल्या ज्या दंडकांमुळे विद्यार्थ्यांवर पदवी अभ्यासक्रम सहा वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे बंधन होते, ते दंडक (ऑर्डिनन्स) क्रमांक ७९ आणि ८० (अ) आता रद्द करण्यात आले आहेत.

नव्या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांचे कोणत्याही स्तरावरील शिक्षण खंडित होऊ नये, तसेच काही कारणांनी शिक्षणापासून दुरावल्यास पुन्हा उर्वरित शिक्षण पूर्ण करण्याची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या पूर्वीच्या कायद्यानुसार अस्तित्वात आलेले दंडक ७९ व ८० (अ) हे या धोरणातील तरतुदीला छेद देणारे ठरत असल्याने ते रद्द करण्याची शिफारस विद्यापीठाने कुलपती कार्यालयास केली होती.

Shivaji University Kolhapur
Kolhapur Rain : 'पंचगंगा' इशारा पातळी गाठणार! राधानगरीत 5.95 TMC तर 'या' 14 धरणांत किती आहे साठा? जाणून घ्या..

ती शिफारस मान्य करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आज दिली. पूर्वी दंडक ७९ नुसार पदवी स्तरावरील विद्यार्थी कोणत्याही एका वर्षातील परीक्षेत एखाद्या विषयात अनुत्तीर्ण झाला असल्यास त्या वर्षात असणारे सर्व विषय त्या परीक्षेच्या सत्रापासून सहा वर्षात उत्तीर्ण होणे आवश्यक होते.

Shivaji University Kolhapur
निवडणुका जवळ आल्या, की मतदारसंघात दिसणारे केसरकर आहेत कुठे? पूरस्थितीवरुन ठाकरे गटाचा सवाल

विद्यार्थी जर सहा वर्षांत त्या विषयांत उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर सहा वर्षांपूर्वी ज्या विषयात उत्तीर्ण झाला असेल, त्या संपूर्ण वर्षामध्ये असणाऱ्या विषयांची परीक्षा त्याला पुन्हा संबंधित वर्गात नव्याने प्रवेश घेऊन द्यावी लागत असे. ही अट आता रद्द करण्यात आली आहे. दंडक ८० (अ) नुसार बी.ए./ बी.कॉम./ बी.एस्सी या पदवी अभ्यासक्रमातील नियमित अथवा दूरस्थ विद्यार्थ्यांस त्याच्या प्रथम परीक्षेपासून सहा वर्षांत संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक होते.

तथापि, जर विद्यार्थी निर्धारित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करू शकला नाही, तर त्याची भाग १, २ व ३ मधील परीक्षेची संपूर्ण संपादणूक रद्द होत असे आणि त्याला पुनश्च परीक्षा द्याव्या लागत असत. हा दंडकही आता रद्द करण्यात आला असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

Shivaji University Kolhapur
Satara Crime : रात्रीत असं काय घडलं? अख्खं कुटुंबच अंथरुणात मृत्युमुखी पडलं; साताऱ्यात हादरून सोडणारी घटना

ॲकॅडेमिक क्रेडिटस् घेता येणार

‘या दोन्ही दंडकांमध्ये असणारी तरतूद राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने बदलणे आवश्यक असल्याने विद्यापीठाकडून हे दंडक रद्द करण्याबाबतची कार्यवाही आता पूर्ण झाली आहे. आता विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ॲकॅडेमिक क्रेडिटस् घेता येतील आणि ते ॲकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये एकत्रित जमाही करता येतील’, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.