Shivaji University : पदवीधरांसाठी महत्वाची बातमी! शिवाजी विद्यापीठ 'हे' डिग्री सर्टिफिकेट देणार ऑनलाईन

सध्या हे सर्टिफिकेट विद्यापीठातील संबंधित विभागातून प्रत्यक्ष उपस्थित राहून देण्यात येत होते.
Shivaji University
Shivaji Universityesakal
Updated on
Summary

विद्यार्थ्यांना ऑनलाईन सर्टिफिकेट देण्याच्या उद्देशाने परीक्षा मंडळाने संबंधित नवी सुविधा सुरू केली आहे.

कोल्हापूर : पदवी, पदविका, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता शिवाजी विद्यापीठ (Shivaji University) प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट (तात्पुरते पदवी प्रमाणपत्र) ऑनलाईन देणार आहेत. परीक्षा व मूल्यमापन मंडळाने विद्यार्थ्यांसाठी नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांमधून पदवी, पदविका तसेच पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीकरिता, व्यवसायासाठी त्यांना पदवी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. तथापि ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपावेतो पदवी प्रमाणपत्र स्वीकारलेले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेटची (Provisional Degree Certificate) तरतूद विद्यापीठाने केली आहे.

Shivaji University
Kolhapur : काँग्रेस-राष्ट्रवादीतील मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार; महाडिकांनी टाकला बॉम्ब, राजकीय वर्तुळात चर्चा

सध्या हे सर्टिफिकेट विद्यापीठातील संबंधित विभागातून प्रत्यक्ष उपस्थित राहून देण्यात येत होते. या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सर्टिफिकेट देण्याच्या उद्देशाने परीक्षा मंडळाने संबंधित नवी सुविधा सुरू केली आहे. विद्यार्थ्याने १३० रूपये शुल्क पेमेंट गेटवेद्वारे भरल्यानंतर आणि अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर त्याला त्याचदिवशी सर्टिफिकेट ऑनलाईन मिळणार आहे.

Shivaji University
Satara Politics : आम्हाला बेअक्कल म्हणता, मग लोकसभेला का पडलात? शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर निशाणा

परीक्षाविषयक अडचणी सोडविण्यासाठी पोर्टल

विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात असणाऱ्या वेगवेगळ्या शंका, अडचणी, समस्या दूर करण्यासाठी आता विद्यापीठात येण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी ऑनलाईन ग्रिव्हेन्स पोर्टल तयार करण्यात आले आहे. या सुविधेमार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल, संगणक, लॅपटॉपद्वारे नोंद करता येईल. या विद्यार्थ्यांच्या समस्या विद्यापीठाला ऑनलाईन स्वरुपात प्राप्त झाल्यानंतर तात्काळ सोडवणूक होण्याच्या दृष्टीने मदत होणार असल्याचे परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले.

Shivaji University
Congress : विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर; पराभूत झालेल्या माजी मुख्यमंत्र्याला संधी

`या सुविधांसाठीची संगणक प्रणाली कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्या मार्गदर्शनामुळे परीक्षा विभागातील आय. टी. सेल यांनी स्वतः विकसित केली आहे. या दोन्ही सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.

- डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Shivaji University
Udayanaraje Bhosale : 'माझ्यात आणि देसाईंमध्ये जुंपून देण्याचं काम, स्वत:चा उदो उदो करून घेणारा मी नाही'

‘ऑनलाईन स्वरूपात प्रॉव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट मिळावी ही मागणी विद्यापीठाकडे केली होती. त्यास प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला याचा आनंद आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांचा ताण कमी होऊन त्यांचा इतर विकासात्मक कामात हातभार लागणार आहे. आर्थिक बचत होणार आहे.

-अभिषेक मिठारी, अधिसभा सदस्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()