बदलते तंत्रज्ञान : ‘स्मार्ट’ शेतीच्या दिशेने..

Smart-Agriculture
Smart-Agriculture
Updated on

जगाची लोकसंखा २०३० पर्यंत ८.५ अब्जावर जाईल. आपण या वाढत्या संख्येने लोकांना खायला देऊ शकू का, हा मुख्य प्रश्‍न आहे. या प्रश्‍नाचा सामना करण्यासाठी संशोधक आणि संगणक शास्त्रज्ञ नवतंत्रज्ञान शोधण्याचा प्रयत्नात आहेत. आज उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीचे शेती अधिक विश्वासार्ह, उच्च उत्पन्न देणारी आणि अधिक कार्यक्षम होईल, पाहण्याची गरज आहे व जगभरात त्यावर अनेक प्रयोग होत आहेत. भारतात काही शेतकऱ्यांनी चांगल्या  उत्पादनासाठी Precision farming वापरण्यास सुरूवात करीत आहेत.

प्रिसिजन शेती ही एक एकीकृत पीक व्यवस्थापन प्रणाली आहे, जी पीक क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी रिमोट सेन्सिंग (आरएस), जीपीएस आणि जीआयएस वापरते. सेन्सर शेतकऱ्यांना मातीची गुणवत्ता, आर्द्रता पातळीचे मूल्यांकन करू देते आणि कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, याचेही मूल्यांकन करते. हवामान अंदाज, सिंचन आणि काढणीच्या नियोजनात मदत करते. ड्रोनमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यास, डेटा तयार करण्यात आणि रसायने फवारणी आणि बियाणे निवडीत मदत करते.प्रेसिजन शेती ही पर्यावरणपूरक आणि किफायतशीर आहे. शेतीच्या अवजारांव्यतिरिक्त पाणी, औषधी वनस्पती, कीटकनाशके आणि खतांचा कमीत कमी वापर केल्यास हे दिसून येते. हे शेतीविषयक माहिती योग्य वेळी आणि आवश्यकतेनुसार योग्य प्रमाणात वापरण्याची परवानगी देऊन शेतीची संपूर्ण व्यवस्थापन निर्णय घेण्याची प्रक्रिया स्वयंचलित करते आणि सुलभ करते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रिमोट मॉनिटरिंग
रिमोट मॉनिटरिंग आणि स्वयंचलित वाहनांच्या मदतीने शेतीच्या समस्या सोडविणे सोपे झाले आहे. जेम्स मॅक्शे हा टास्मानियातील अभिनव शेतकरी आपल्या पाळीव प्राण्यांची निगा राखण्यासाठी संगणक विज्ञानाकडे वळला. त्याने एक प्रोग्रामरच्या मदतीने स्मार्टफोन अॅप तयार केले, ज्यामुळे शेतकऱ्यांना पशुधन नोंदी, गुरांचे चरणे आणि खाद्याचा वापर, पशू उपचारांच्या नोंदी, पीक कामगिरी आणि साठवण सूची यांसारख्या माहितीची नोंद होऊ शकली. हायड्रोपोनिक शेती काही दिवसात मोठ्या प्रमाणात पिके घेण्यास सक्षम होईल! जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत, मात्र जगभरातील शेतकरी एकाच वेळी वापरू शकतील अशा तंत्रज्ञानाची अद्याप प्रतीक्षा आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.