डॉ. मिलिंद नाईक
कला शाखा म्हटले की, खूप काही विषय डोळ्यांसमोर येतात. सामाजिकशास्त्रे जसे, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र इ., भाषा जशा- मराठी, हिंदी, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच आणि कला जसे की, चित्रकला, नृत्यकला, नाट्यकला, गायन, वादन इ. यातील सामाजिकशास्त्राचा आढावा आज आपण घेऊया. नैसर्गिकशास्त्रांमधे विविध वस्तूंचा-सृष्टीचा अभ्यास केला जातो. जसे पेशीविभाजन, गतीचे नियम, रासायनिक अभिक्रिया; मात्र सामाजिकशास्त्रांमधे मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो.