सोलापूर : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (National Institute of Open Schooling : NIOS) ने दहावी आणि बारावीच्या जून 2021 बोर्ड परीक्षा 2021 साठी फी जमा करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. आता माध्यमिक व वरिष्ठ माध्यमिक विद्यार्थी 15 मे 2021 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत बोर्ड परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी फी जमा करू शकतात. एनआयओएसने एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. परीक्षा शुल्क 1500 रुपये आहे. (Extension for payment of fees for Secondary and Senior Secondary Examinations)
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जून महिन्यात प्रस्तावित दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेला नाही, ते एनआयओएस sdmis.nios.ac.in च्या अधिकृत साइटवर जाऊन देखील अर्ज करू शकतात. त्याशिवाय खाली दिलेल्या सोप्या टप्प्यांचे अनुसरण करूनही विद्यार्थी अर्ज करू शकतात.
दहावी व बारावी बोर्ड परीक्षांसाठी असा करा अर्ज
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी एनआयओएसच्या वेबसाइट https://sdmis.nios.ac.in/regmission/exam वर भेट द्यावी. यानंतर मुख्य पेजवर उपलब्ध असलेल्या नोंदणी लिंकवर जा. यानंतर नावनोंदणी क्रमांक प्रविष्ट करा आणि लॉगइन करा. यानंतर राज्य, ओळख प्रकार निवडा आणि कोर्स लिंकवर क्लिक करा. यानंतर विषय आणि अभ्यास केंद्र निवडा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर परीक्षा शुल्क भरा. अर्ज केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा आणि एक प्रिंट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवा.
एनआयओएस बोर्ड परीक्षा जून 2021 मध्ये घेण्यात येईल. तथापि, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगतर्फे दहावी आणि बारावीसाठी परीक्षा जाहीर होणे बाकी आहे. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर भेट देत अपडेट चेक करावा लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.