एनटीपीसीमध्ये ट्रेनी एक्‍झिक्‍युटिव्ह इंजिनिअर पदांची भरती !

एनटीपीसीमध्ये ट्रेनी एक्‍झिक्‍युटिव्ह इंजिनिअर पदांची होणार भरती
NTPC
NTPCGoogle
Updated on

सोलापूर : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये (National Thermal Power Corporation, NTPC) एक्‍झिक्‍युटिव्ह इंजिनिअर ट्रेनी पदांच्या (Executive Engineer Trainee Posts) नेमणुका होणार आहेत. त्याअंतर्गत एकूण 280 पदांवर भरती होईल. एनटीपीसीच्या या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणारा उमेदवार गेट परीक्षा पात्र असावा, याची नोंद घ्यावी. त्याचबरोबर ऑनलाइन अर्ज करणारे उमेदवार अधिकृत ntpc.co.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. एनटीपीसी ऍप्लिकेशन पोर्टलनुसार (NTPC Application Portal) 21 मे 2021 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया 10 जून 2021 पर्यंत सुरू राहील. (Recruitment of Trainee Executive Engineer posts in NTPC)

NTPC
लॉकडाउन संपल्यानंतरच "आरटीई' प्रवेश !

एनटीपीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ही भरती इलेक्‍ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि इन्स्ट्रुमेंटेशन विभागात केली जाईल. त्याचबरोबर या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 40 हजार ते एक लाख 40 हजार रुपये वेतन दिले जाईल.

"या' तारखा लक्षात ठेवा

  • एनटीपीसीमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याचा प्रारंभ तारीख : 21 मे 2021

  • एनटीपीसीकडे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 10 जून 2021

NTPC
"एमपीएससी'चे सरकारला पत्र ! रखडलेल्या नियुक्‍त्या अन्‌ परीक्षांबाबत केली विचारणा

असा करा ऑनलाइन अर्ज

एनटीपीसीने जारी केलेल्या भरती अधिसूचनेनुसार इच्छुक व पात्र उमेदवार 21 मे ते 10 जून 2021 या कालावधीत www.ntpccareer.net वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या विभागांमध्ये होतील नेमणुका

इलेक्‍ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि इन्स्ट्रुमेंटेशन विभागात नेमणुका केल्या जातील. त्याचबरोबर या पदांवरील उमेदवारांचे कमाल वय 27 वर्षे असावे.

अशी होईल निवड

गेट स्कोअर 2021 च्या आधारे ग्रुप डिस्कशन (जीडी) आणि मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी केली जाईल. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.