यूपीएससी एनडीए (2) परीक्षेची अधिसूचना होणार "या' दिवशी प्रसिद्ध !

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या यूपीएससी एनडीए (2) परीक्षेची अधिसूचना होणार या दिवशी प्रसिद्ध
UPSC
UPSCCanva
Updated on

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) (Union Public Service Commission : UPSC) द्वारा राष्ट्रीय संरक्षण ऍकॅडमी (एनडीए) (National Defense Academy) आणि नेव्हल ऍकॅडमी (एनए) (Naval Academy) परीक्षा (2), 2021 ची अधिसूचना 9 जून 2021 रोजी जाहीर केली जाईल. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून अर्जाची प्रक्रिया सुरू होईल. इच्छुक व पात्र उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत पोर्टल upsconline.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2021 आहे. (The notification of UPSC NDA exam to be held in September will be released on this day)

UPSC
"एमपीएससी'चे सरकारला पत्र ! रखडलेल्या नियुक्‍त्या अन्‌ परीक्षांबाबत केली विचारणा

यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाहीर केलेल्या 2021 वर्षानुसार, एनडीए आणि एनए परीक्षा 5 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. वेबसाइटवर सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रतेसह अर्जाशी संबंधित संपूर्ण माहिती मिळू शकेल. सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा ही 2021 ची दुसरी परीक्षा असेल. वर्षातून दोनदा ही परीक्षा घेतली जाते. पहिली परीक्षा एप्रिलमध्ये तर दुसरी परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येते. तथापि, सप्टेंबरच्या परीक्षेची अधिसूचना देखील देशभरात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता पुढे ढकलण्याची शक्‍यताही आहे.

UPSC
लॉकडाउन संपल्यानंतरच "आरटीई' प्रवेश !

असा करा ऑनलाइन अर्ज

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत पोर्टल upsconline.nic.in वर भेट द्यावी लागेल. यानंतर, मुख्य पेजवर उपलब्ध संघ लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांच्या ऑनलाइन अर्ज लिंकवर क्‍लिक करा. आता तुम्ही नवीन पेजवर असाल. येथे उपलब्ध संबंधित भरती परीक्षेच्या रजिस्ट्रेशन लिंकद्वारे आपण अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यास सक्षम असाल.

राष्ट्रीय संरक्षण ऍकॅडमी (एनडीए) आणि नेव्हल ऍकॅडमी (एनए) मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रथम लेखी परीक्षा घेतली जाते. संघ लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षा घेतली जाते. यात यशस्वी घोषित झालेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या प्रक्रियेतून जावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.