परीक्षेच्या सरावास कमी वेळ; वेळापत्रक उशिरा जाहीर झाल्याने शाळांसमोर पेच

ssc-hsc-exam
ssc-hsc-examsakal media
Updated on

मुंबई : दरवर्षी सप्टेंबरपूर्वीच जाहीर होणारे दहावी, बारावीच्या लेखी व तोंडी परीक्षांचे वेळापत्रक (SSC and HSC exam timetable) यंदा राज्य शिक्षण मंडळाने (Maharashtra education board) गेल्या आठवड्यात जाहीर केले. अत्यंत उशिरा वेळापत्रक जाहीर (Timetable late announcement) झाल्याने परीक्षेसाठी अभ्यास, सरावास अत्यंत कमी वेळ मिळणार असून त्यामुळे नियोजनच चुकल्याचे शाळांकडून सांगितले जात आहे.

ssc-hsc-exam
डोंबिवलीत काँग्रेस कार्यालयाची तोडफोड; रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानुसार यंदा फेब्रुवारी-मार्चदरम्यान दहावी, बारावीच्या तोंडी व लेखी परीक्षा होत आहेत; मात्र कोरोनामुळे यंदा शाळा उशिरा सुरू झाल्या. त्यानंतरही ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यामुळे दहावी-बारावीचा अभ्यासक्रम हा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा परीक्षा आठवडाभर उशिरा सुरू होणार असल्या तरी परीक्षेचे वेळापत्रक उशिरा कळाल्याने परीक्षेसासाठी आवश्यक असलेल्या सरावांना कमी वेळ मिळण्याची शक्यता आहे.

अनेक शाळांमध्ये व्याकरण, कठीण गणिते, विज्ञानातील प्रयोग आदी अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवले असले तरी प्रत्यक्षात लेखी परीक्षांचा जास्तीत जास्त सराव आणि प्रात्यक्षिक परीक्षांच्या सरावासाठी कमी वेळ मिळण्याची शक्यता आहे. अनेक शाळांमध्ये मूळ अभ्यासक्रम हा फेब्रुवारीपर्यंत चालण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाठी वेळ कमी मिळण्याची शक्यता शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

ssc-hsc-exam
मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सात पटीने वाढ; 865 रुग्णांची नोंद

परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा परीक्षा अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थी नियमित शुल्कासह २६ डिसेंबरपर्यंत; तर विलंब शुल्कासह २७ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करू शकतात, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डाॅ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येईल.

आई-वडील गमावलेल्यांचे परीक्षा शुल्क माफ

कोरोनामुळे मागील वर्षांत ज्या विद्यार्थ्यांनी आई, वडील अथवा कायदेशीर पालक गमावले त्या सर्व विद्यार्थ्यांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांत विशेष बाब म्हणून हा निर्णय घेतलल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.