SSC Exam Result 2023 : नापास झालात?मार्क्स कमी पडलेत? बोर्डाकडून पुन्हा मिळेल संधी

काही विद्यार्थी असेही असतात की ज्यांना आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुरेसे मार्क्स मिळाले नाहीत.
result
resultesakal
Updated on

दहावीच्या परिक्षेचा निकाल उद्या लागणार आहे. या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही आहे. या दहावीच्या निकालानंतर अनेकांनी आपापले प्लॅन्स बनवले असतील. काहींचे राहिले असतील, तर निकालानंतर बनवता येतील.

आता जे विद्यार्थी या परिक्षेत पास होतील, ते पुढे जातील. आपण ठरवलेल्या क्षेत्रात, ठरवलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतील. पण जे नापास होतील, त्यांच्यासमोर आता पुढे काय हा प्रश्न असेल. पुन्हा परिक्षा द्या, पुन्हा अभ्यास करा, हे सगळं करावं लागेल. शिवाय काही विद्यार्थी असेही असतात की ज्यांना आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुरेसे मार्क्स मिळाले नाहीत.

अशा विद्यार्थ्यांसाठी दहावीच्या बोर्डाने संधी उपलब्ध करून दिल्या आहे. मार्च २०२३ च्या परिक्षेला सगळ्या विषयांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगेच दोन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. जुलै - ऑगस्ट २०२३ आणि मार्च २०२४ मध्ये श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

result
10th SSC Result 2023: उद्या १ वाजता लागणार दहावीचा निकाल, या वेबसाइटवर मिळेल संपूर्ण माहिती

जुलै ऑगस्ट २०२३ मध्ये होणारी पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी ७ जूनपासून मंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतो. त्याबद्दलचं परिपत्रक स्वतंत्रपणे काढण्यात येईल. शिवाय रिचेकिंग म्हणजे गुणपडताळणीही विद्यार्थ्यांना करता येणार आहे.

कशी करणार गुणपडताळणी?

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी ( श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. SSC Result

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.