SSC GD Constable : १० वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये तब्बल ७५७६८ पदांवर रिक्त जागा निघाल्या आहेत. या संदर्भातली अधिसूचना कर्मचारी निवड आयोगाने जीडी कॉन्स्टेबल भरती २०२३ साठी जारी केली आहे.
ज्याद्वारे तब्बल ७५७६८ पदांवर भरती केली जाणार आहे. या जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवार आजपासून SSC च्या अधिकृत वेबसाईटवर ssc.nic.in ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 28 डिसेंबर आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे विविध केंद्रीय सशस्त्र दलांमध्ये जनरल ड्युटी कॉन्स्टेबलची पदे भरली जाणार आहेत. यामध्ये, बीएसएफच्या 27875, सीआयएसएफच्या (CISF) च्या 8598, सीआरपीएफच्या (CRPF) 25427 एसएसबीच्या (SSB) 5278 आणि आयटीबीपीच्या (ITBP) 3006 तर आसाम रायफल्सच्या 4776 आणि एसएसएफच्या 583 जागांचा समावेश आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे १० वी उत्तीर्णचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराचे वय हे १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावे. शिवाय, कमाल वयोमर्यादेत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष ते ५ वर्षांपर्यंत सूट दिली जाणार आहे.
या भरती प्रक्रिये अंतर्गत उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही SSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.