मुंबई : दहावीचा निकाल लागल्यानंतर जिथेतिथे जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण असताना एक वेगळाच निकाल समोर आला आहे. पुण्याच्या शुभम जाधव या विद्यार्थ्याने सर्व विषयांत ३५ गुण मिळवत ३५ टक्के मिळवले आहेत. पुण्यातल्या गंजपेठेमध्ये शुभम राहातो.
नववीत शुभमला ६७ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे आपल्याला दहावीला किमान ५०-६० टक्के तरी पडतील अशी अपेक्षा शुभमला होती. शुभमची आई धुणी-भांडी करते. त्याने अतिशय मन लावून दहावीचा अभ्यास केला होता. मित्रांच्या बरोबरीने आपणही चांगले गुण मिळवू, अशी त्याला अपेक्षा होती; मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. पण शुभमने मिळवलेले यश चारचौघांपेक्षा वेगळे आहे.
विद्यार्थी एकतर उत्तीर्ण होतात किंवा अनुत्तीर्ण होतात. काठावर उत्तीर्ण होणाऱ्यांचीही संख्या काही प्रमाणात असते; मात्र शुभमने ज्या प्रकारचे गुण प्राप्त केले आहेत तसे करणे हे ठरवूनही कोणाला जमत नाही.
मित्रांच्या बरोबरीने शुभमनेही खूप अभ्यास केला होता. मात्र ऐनवेळी सगळा अभ्यास विसरल्याने त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. शुभमला पोलीस बनायचे आहे. दहावीचे गुण बघितल्यानंतर तो काहीसा नाराज झाला. पण आपण किमान उत्तीर्ण झालो याचा त्याला आनंद आहे. आता बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा निर्धार त्याने केला आहे. बारावीला किमान ७० टक्के तरी मिळावेत असे त्याला वाटते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.