दहावी निकालाचे संकेतस्थळ क्रॅश झाल्याचा अहवाल रखडला

website
websitesakal media
Updated on

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीचा निकाल (SSC result) १६ जुलै रोजी जाहीर झाला, त्यावेळी निकालाचे संकेस्थळ क्रॅश (website crash) झाले होते, त्याची कारणे शोधणारा अहवाल (show cause notice) मागील दोन महिन्यांपासून रखडला असल्याने याविषयी शिक्षण विभागात (education system) उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासभरात संकेतस्थळ क्रॅश होते, दिवसभर विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नव्हता. त्यामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक आणि इतर अडचणींची माहिती घेऊन त्यासाठीचा अहवाल हा पुढील १५ दिवसांत सादर करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती, परंतु दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर त्यासाठीचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला नसल्याचे संकेतस्थळ का क्रॅश झाले यामागील गुपिते समोर येऊ शकली नसल्याचे बोलले जात आहे.

website
म्हाडामध्ये 565 पदांसाठी भरती; उद्यापासून संकेतस्थळावर माहिती

निकालाची वेबसाईट क्रॅश झाल्याप्रकरणी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीत सूचना आणि तांत्रिक विभागाचे सचिव, उद्योग उर्जा आणि संरक्षणावरील विभाग उपसचिव, शिक्षण विभाग तांत्रिक सल्लागार, पुणे शिक्षण मंडळाचे उपसंचालक यांचा समावेश होता.

निकालाच्या आधी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला होता का? निकालाच्या आधी राज्य मंडळाने संबंधित सल्लागारांना याची पूर्वसूचना दिली होती का? संकेतस्थळाचे काम करणाऱ्या कंपनीला निकाल जाहीर करण्याच्या तारखेविषयी माहिती होती? भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सूचना, यात चूक कोणाची याचा शोध घेण्याची जबाबदारी या समितीची होती. मात्र अद्यापपर्यंत या समितीने कोणताही अहवाल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पाठविलेला नसल्याचे अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.