Maharashtra 10th SSC Results 2024 Declared : दहावीत सुद्धा लातूर पॅटर्न…चक्क इतक्या विद्यार्थ्यांना मिळाले शंभर टक्के!

Maharashtra 10th SSC Results 2024 Declared : राज्यात लातूरची मुलं हुश्शार, यंदा एकूण १२३ विद्यार्थ्यांना मिळाले शंभर टक्के.
Maharashtra 10th SSC Results 2024 Declared
Maharashtra 10th SSC Results 2024 Declaredesakal
Updated on

Maharashtra 10th SSC Results 2024 Declared : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतीच इयत्ता दहावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. यंदा दहावीचा एकूण निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. यंदा दहावीच्या निकालात लातूर विभागातील तब्बल १२३ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मिळवून राज्याच्या निकालात लातूरचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला.

राज्य मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मागील आठवड्यात जाहीर झाला. त्यानंतर दहावीच्या निकालाकडे राज्यातील तमाम विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य मंडळाने दहावीच्या निकालाची आज घोषणा केली. त्यानुसार राज्यात १८७ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मिळवले असून, यात तब्बल १२३ विद्यार्थी हे लातूर विभागातील असल्याची माहिती मंडळातर्फे जाहीर करण्यात आली.

मागील वर्षी २०२३ मध्ये राज्यातील १५१ विद्यार्थ्यांपैकी लातूरमधील १०८ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के मिळवले होते. तर २०२२ मध्ये राज्यातील १२२ विद्यार्थ्यांपैकी लातूरच्या ७० विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के मिळवून लातूरची गुणवत्ता सिद्ध केली होती. तीच परंपरा यंदाही कायम असल्याचे दिसून आले आहे.

यंदा राज्यातील ८१ हजार ९९१ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तसेच, ५ लाख ५८ हजार २१ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे शंभर टक्के गुण प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांचा लाभ मिळाल्याची माहिती राज्य मंडळाने दिली.

लातूर विभागाचा निकाल ९५.२७ टक्के

लातूर विभागीय मंडळामध्ये लातूर, धाराशिव आणि नांदेड या तीन जिल्ह्यांचा समावेश असून ४०८ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या विभागातील एक लाख सात हजार ५२३ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली होती. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ४६ हजार ५२०, धाराशिव जिल्ह्यातील २२ हजार ४४१ तर लातूर जिल्ह्यातील ३८ हजार ५६२ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी एक लाख चार हजार ५०३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यातील ९९ हजार ५१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर विभागाचा ९५.२७ टक्के निकाल जाहीर झाला आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागातील ३२, पुणे विभागातील १०, मुंबई विभागातील ८ आणि कोल्हापूर विभागातील ३ विद्यार्थ्यांना एकूण शंभर टक्के गुण मिळाले आहेत. लातूर विभागातून तब्बल १२३ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण प्राप्त करून लातूर पॅटर्न चांगलाच गाजवला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल आज (२७ मे) दुपारी १ वाजता बोर्डाच्या या sscresult.mahahsscboard.in अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे :

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.