SSC Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांना बुधवारपासून मिळणार ‘हॉल तिकीट; 'या' वेबसाईटवर मिळेल प्रवेशपत्र

Class 10th students will get hall ticket from Wednesday: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची प्रवेशपत्र (हॉल तिकीट) विद्यार्थ्यांना बुधवारपासून (ता. ३१) माध्यमिक शाळांमध्ये मिळणार आहेत.
SSC HSC Exam
SSC HSC ExamSakal
Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची प्रवेशपत्र (हॉल तिकीट) विद्यार्थ्यांना बुधवारपासून (ता. ३१) माध्यमिक शाळांमध्ये मिळणार आहेत. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमार्फत ही प्रवेशपत्र मिळणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होत आहे. तसेच, दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२४च्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर बुधवारपासून ‘स्कूल लॉगिन’मध्ये डाऊनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे. काही तांत्रिक अडचण उद्‌भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून द्यायची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेण्यात येऊ नये. संबंधित प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

तसेच, विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रामध्ये विषय, माध्यम बदल असतील, तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. त्याचप्रमाणे प्रवेशपत्रावरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे.

छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी. तसेच विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांस माध्यमिक शाळांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावा, अशा सूचना ओक यांनी प्रकटनाद्वारे दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.