एनडीएच्या मुलाखती पुढे ढकलण्याची राज्य शिक्षण मंडळाची मागणी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा येत्या शुक्रवारपासून (ता. ४) सुरू होत आहेत.
NDA
NDAsakal
Updated on
Summary

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा येत्या शुक्रवारपासून (ता. ४) सुरू होत आहेत.

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा येत्या शुक्रवारपासून (ता. ४) सुरू होत आहेत. परंतु बारावीची परीक्षा (HSC Exam) आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) (NDA) तर्फे घेण्यात येणाऱ्या मुलाखती (Interview) या एकाचवेळी येत आहेत. त्यामुळे एनडीएच्या मुलाखती देणाऱ्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीच्या वेळापत्रकात (Time Table) बदल (Changes) करण्यात यावा, अशी मागणी राज्य शिक्षण मंडळाने (State Education Mandal) पत्राद्वारे ‘एनडीए’कडे केली.

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल आणि दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत होत आहे. या परीक्षेच्या अंतिम टप्प्यात म्हणजेच ४ ते ९ एप्रिलदरम्यान एनडीएच्या परीक्षेचाच एक भाग असणाऱ्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. राज्य मंडळात बारावी परीक्षा देणारे काही विद्यार्थी हे या मुलाखतीसाठी देखील पात्र आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी राज्य मंडळाला याची माहिती दिली. त्याची दखल घेत राज्य मंडळाने एनडीएला राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे मुलाखतीचे वेळापत्रक बदलावे, असे सांगितले आहे.

NDA
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो; मन मे हैं विश्‍वास, होंगे कामयाब...

दहावी-बारावीची परीक्षा पूर्वनियोजित असून त्याचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. तब्बल १४ लाखांहून अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देतात. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे. या कालावधीत बारावीचे पेपर असणारे विद्यार्थी एनडीएच्या मुलाखतीला हजर राहू शकणार नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे वेळापत्रक बदलण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीकडे केली आहे.

- शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()